Crashes Truck Into White House Barrier : व्हाईट हाऊस सुरक्षा कठड्यावर ट्रक धडकविणारा अटकेत

Crashes Truck Into White House Barrier : व्हाईट हाऊस सुरक्षा कठड्यावर ट्रक धडकविणारा अटकेत

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसच्या सुरक्षा कठड्यावर ट्रक धडकविल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळ भारतीय असून, साई वर्षित कंडुला (वय 19) त्याचे नाव आहे. ट्रक धडकवल्यानंतर साई ट्रकमधून बाहेर आला आणि नाझी झेंडा फडकावू लागला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ठार मारायचे होते, असे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. सहा महिन्यांपासून त्याचे यासाठी नियोजन सुरू होते. साई याने ओरिजनल कागदपत्रे देऊनच व्हर्जिनियातून ट्रक भाड्याने घेतला होता. (Crashes Truck Into White House Barrier)

साई हा नाझी समर्थक आहे. हिटलरचा त्याच्यावर प्रभाव असल्याचे तो सांगतो. त्याने धडकविलेल्या ट्रकमध्ये कोणतीही शस्त्रे किंवा स्फोटके सापडली नाहीत. साईने ट्रक धडकविला तेव्हा राष्ट्राध्यक्ष बायडेन व्हाईट हाऊसमध्येच होते, हे विशेष! साईच्या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.(Crashes Truck Into White House Barrier)

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news