Javed Ahmed Wani: कुलगाममधून लष्कराचा जवान बेपत्ता; कारमध्ये आढळले रक्ताचे डाग

Javed Ahmed Wani: कुलगाममधून लष्कराचा जवान बेपत्ता; कारमध्ये आढळले रक्ताचे डाग
Published on
Updated on

कुलगाम: पुढारी ऑनलाईन: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून  भारतीय लष्कराचा एक जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील अष्टल भागात राहणारा जावेद अहमद वानी (Javed Ahmed Wani)  शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाला आहे. वानीची कार पर्नहॉलमध्ये आढळून आली आहे. वानी लडाख भागात तैनात होता. सध्या तो रजेवर होता. त्याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास वानी (Javed Ahmed Wani) काही सामान घेण्यासाठी आपल्या कारमधून बाजारात गेला होता. त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बाजारपेठेजवळ त्याची कार आढळून आली. कारमध्ये रक्ताचे डाग आढळून आले आहेत. या जवानाच्या शोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. जवानाच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रीय रायफल्सनेही या जवानाच्या शोधासाठी जवळपासच्या गावांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. अद्याप तरी या जवानाचा काही मागमूस लागलेला नाही.

Javed Ahmed Wani : 2017 मध्येही दहशतवाद्यांनी जवानाचे अपहरण करून गोळ्या झाडल्या होत्या.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांच्या अपहरणाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकवेळा दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांचे अपहरण केले होते. मे 2017 मध्येही दहशतवाद्यांनी सुट्टीसाठी घरी आलेल्या औरंगजेब या लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण केले होते. यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. औरंगदेब एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news