Indian Air Force | १.६ लाख कोटींची मेगा डील, ९७ ‘तेजस’ विमाने, १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदीला DAC ची मंजुरी

Indian Air Force
Indian Air Force

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील लष्करी आणि संरक्षण उत्पादनाला मोठी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण संपादन परिषदेने ९७ अतिरिक्त तेजस विमाने आणि १५६ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच ८४ सुखोई एसयू-३० लढाऊ विमानांच्या अपग्रेड योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. ही दोन्ही विमाने स्वदेशी बनावटीची असून, करारांची एकूण रक्कम सुमारे १.६ लाख कोटी आहे, असेही संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती म्हटले आहे, या संदर्भातील माहिती एएनआयने ट्विट करत दिली आहे. (Indian Air Force)

संरक्षण संपादन परिषदेने (DAC) १.६ लाख कोटी रुपयांच्या मेगा डीलसाठी ९७ तेजस विमाने आणि १५६ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. असे सूत्रांनी ३० नोव्हेंबर रोजी CNBC आवाजला दिलेल्या माहितीत सांगितले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही तेजस आणि प्रचंड विमानांची देशांतर्गत पुरवठा करणारी कंपनी आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी १.६ लाख कोटी रुपयांचा करार मंजूर केला आहे, ज्यामध्ये १ विमानवाहू जहाजाचा समावेश आहे. (Indian Air Force)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान हा करार करण्यात आला आहे. सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्याच्या ८३ तेजस जेट विमानांच्या ताफ्याला पूरक आहे. सध्या भारतीय नौदलात १ विमानवाहू जहाज समाविष्ट करण्यात आले आहे. जे कमीतकमी २८ लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर धारण करू शकते. तसेच ४५ हजार टन पाणी विस्थापित करू शकते. या जहाजावरून फ्रेंच राफेल जेट विमाने उड्डाण करणार आहेत, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे. (Indian Air Force)

यापूर्वी ब्लूमबर्गने स्त्रोतांचा हवाला देत म्हटले आहे की, भारतीय बनावटीची युद्धनौका INS विक्रांत, गेल्या वर्षी ताफ्यात सामील झाली. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने ही तयार केली आहे. तसेच देशाकडे रशिया निर्मित विमानवाहू वाहक देखील आहे, असे देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Indian Air Force)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news