संचलनात मुलींचा सहभाग ही देशासाठी ऐतिहासिक घटना : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संचलनात मुलींचा सहभाग ही देशासाठी ऐतिहासिक घटना : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए)संचलनात मुलींची पहिलीच तुकडी यंदा सहभागी झाली. ही घटना देशासाठी ऐेतिहासिक घटना असून, महिला कॉडेटस देशाचे नाव निश्चितच उंचावतील असे उदगार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करताना काढले.

पुणे शहरातील खडकवासला भागातील एनडीएच्या विद्यार्थांचा दिक्षांत समारंभ झाला.145 व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती होती. पहाटे सहा वाजता ही परेड एनडीएच्या मैदानावर झाली. यावेळी प्रथमच एनडीए मध्ये वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या मुलींच्या पहिल्या तुकडीने मुलांच्या बरोबरीने संचलनात सहभाग दाखवला. यावेळी भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी मुलींचे कौतुक केले. एनडीएमध्ये 2022 मध्ये महिला छात्रांचा समावेश करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले. आजच्या दीक्षांत संंचलनात प्रथमच महिला छात्रांचा सहभाग ही देशासाठीची ऐतिहासिक घटना आहे. महिला कॅडेटस् निश्चितच देशाचे मोठे करतील असा मला विश्वास आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या, वसुधैव कुटूंबकम् ही आपली संस्कृती असून, देशात शांतता,स्थिरता आणि समृध्दी वाढावी म्हणून आपले लष्कर पूर्णतः सक्षम आहे. आपल्या देशाच्या संरक्षणार्थ अनेक लष्करी अधिकारी,जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. लष्करी सेवेत रूजू होणार्या एनडीएच्या छात्रंनी आपल्या वरीष्ठांचे बलिदान कायम लक्षांंत ठेवावे आणि देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे. राष्ट्र सर्वोपरी हीच भावना मनी बाळगून कार्य केल्यानेच तुम्ही यशस्वी व्हाल हे निश्चित. अनेक लष्करी अधिकारी,जवानांनी आपल्या समर्पण भावनेतून दिलेल्या सेवेमुळेच ते सर्वोच्च स्थानावर पोहोचले

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news