Indian Economy: २०४७ पर्यंत भारत होणार ३० ट्रिलियनची अर्थव्यवस्था

Indian Economy
Indian Economy

नवी दिल्ली; वृत्तसंस्था: केंद्रीय नीती आयोग भारताचे २०४७ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करत असून, ते डिसेंबरपर्यंत तयार होईल. या डॉक्युमेंटच्या प्राथमिक निष्कर्षात भारत २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था असेल, असे समोर आले आहे.
नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, डिसेंबरपर्यंत हे व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार असून तीन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते प्रकाशित होईल. (Indian Economy)

सध्या भारत ३. ७ ट्रिलियन डॉलर्स जीडीपीसह जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगभरातील विविध संस्था व अभ्यासकांच्या मते २०३० मध्ये भारताचा जीडीपी जपान आणि जर्मनीला मागे टाकेल. 'एस अँड पी'च्या अंदाजानुसार २०२२ मध्ये असलेला भारताचा जीडीपी ३.४ ट्रिलियन डॉलर्स होता. तो २०३० पर्यंत ७.३ ट्रिलियन डॉलर्स होईल. एस अँड पीने म्हटले आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती ज्या गतीने वाढत आहे, ती पाहता भारत जपानला जीडीपीच्या बाबतीत मागे टाकून एशिया पॅसिफिकमधील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. (Indian Economy)

नीती आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार २०३०-४० दरम्यान भारताची सरासरी आर्थिक वाढ ९.२ टक्के असेल तर २०४० – ४७ या कालावधीत ८.८ टक्के आणि २०३०-४७ या कालावधीत आर्थिक वाढ ९ टक्के असेल. सुब्रह्मण्यम म्हणाले की, या व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून ३० ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी संरचनात्मक बदल आणि सुधारणा अधोरेखित केल्या जातील. याशिवाय भारताचे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, भांडवल, संशोधन आदी बाबतीतील योगदान यावरही त्यात भर असणार आहे. (Indian Economy)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news