India vs Australia 3rd Test | तिसर्‍या कसोटीचे ठिकाण बदलले! धर्मशाला ऐवजी इंदोरला भारत- ऑस्ट्रेलिया सामना

India vs Australia 3rd Test | तिसर्‍या कसोटीचे ठिकाण बदलले! धर्मशाला ऐवजी इंदोरला भारत- ऑस्ट्रेलिया सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे (India vs Australia 3rd Test) ठिकाण बदलण्यात आले आहे. मूळ वेळापत्रकात सामन्याचे नियोजित ठिकाण धर्मशाला होते, पण आउटफिल्ड कसोटी सामन्याच्या दर्जाचे नसल्यामुळे बीसीसीआयने हा कसोटी सामना इंदोरला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

"बॉर्डर-गावसकर करंडक मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना १ ते ५ मार्च दरम्यान HPCA स्टेडियम, धर्मशाला येथे होणार होता. तो आता होळकर स्टेडियम, इंदोर येथे होईल. धर्मशाला येथे कडाक्याच्या थंडीच्या परिस्थितीमुळे आउटफिल्डमध्ये पुरेसे गवत नाही आणि ते पूर्णपणे तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल." असे बीसीसीआयने सोमवारी ट्विट करत म्हटले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा निकाल अवघ्या अडीच दिवसांत लागल्यानंतर थेट तिसर्‍या कसोटीची चर्चा रंगली आहे. उभय संघांमधील तिसरा कसोटी सामना आता धर्मशालाऐवजी इंदोरला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना १ ते ५ मार्चदरम्यान खेळवला जाणार आहे.

धर्मशाला येथील मैदान अद्याप पूर्णपणे तयार झालेले नाही. अशा स्थितीत बीसीसीआयला शेवटच्या क्षणी स्थळ बदलण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

धर्मशालाचे स्टेडियम जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानले जाते, जे उंच टेकड्यांनी वेढलेले आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर शेवटचा प्रथम श्रेणी सामना २०२० मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर या मैदानामध्ये नूतनीकरणाचे सुरू झाले. येथे नवीन आऊटफिल्ड आणि नवीन ड्रेनेज सिस्टीम तयार केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हे काम पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र येथे होत असलेल्या संततधार पावसाने विलंब होत गेला. तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी धर्मशाला येथील मैदान तयार होईल, असे असोसिएशनने सांगितले आहे. (India vs Australia 3rd Test)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news