कोरोना रुग्णसंख्येत घट, पण मृत्यूच्या संख्येने चिंता! २४ तासांत ६७ हजार नवे रुग्ण, १,१८८ मृत्यू

कोरोना रुग्णसंख्येत घट, पण मृत्यूच्या संख्येने चिंता! २४ तासांत ६७ हजार नवे रुग्ण, १,१८८ मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण १ लाखांहून कमी आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत ६७,५९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,१८८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ लाख ८० हजार ४५६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ९ लाख ९४ हजार ८९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी रेट ५.०२ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख २ हजार ८७४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात गेल्या महिन्याभरानंतर १ लाखांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित आढळले आहेत. याआधीच्या दिवशी दिवसभरात ८३ हजार ८७६ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, ८९५ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान १ लाख ९९ हजार ५४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.१९ टक्के नोंदवण्यात आला. यापूर्वी ५ जानेवारीला देशात ९१ हजार कोरोनाबाधित आढळले होते. तर, शनिवारी १ लाख ७ हजार ४७४ कोरोनारूग्णांची नोंद घेण्यात आली होती. महिन्याभरानंतर कोरोना रूग्णसंख्येचा आलेख खाली आल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. पण वाढत्या मृत्यसंख्येची चिंता कायम आहे.

सोमवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्गदर ७.२५ टक्के, तर आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ९.१८ टक्के नोंदवण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये कोरोनाचे १,२९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ६४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीच्या दिवशी प. बंगालमध्ये ८३५ नवे रुग्ण आढळून आले होते. तामिळनाडूत ५,१०४ नवे रुग्ण तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे, नागपूर वगळता मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राला दिलासा,

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी नोंदवली गेलेली घट पाहता पुणे, नागपूर वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतून बाहेर आल्याचे मोठे दिलासादायक चित्र आहे. सोमवारी महाराष्ट्रात ६ हजार ४३६ रुग्णांची नोंद झाली, तर १८ हजार ४२३ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या १ लाख ६ हजार रुग्ण सक्रिय आहेत. सोमवारी पुणे सर्कलमध्ये सर्वाधिक १७४४ नवे रुग्ण आढळले. त्या खालोखाल नागपूर सर्कलमध्ये १०४४ रुग्णांची भर पडली होता. अन्य सर्कल्सपैकी अकोला सर्कलमध्ये २०५, लातूर सर्कलमध्ये २८३, औरंगाबाद सर्कलमध्ये ३६४ आणि कोल्हापूर सर्कलमध्ये ३२८ नवे रुग्ण आढळले. राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही. मुंबईतही सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली.

मुंबईतील टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यापेक्षाही कमी येत आहे. याचा अर्थ मुंबई तिसर्‍या लाटेतून आहेर आलेली दिसते. पुणे आणि नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्रही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतून बाहेर पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news