IND vs NED : भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान

IND vs NED : भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान

Published on

बंगळूर; वृत्तसंस्था : विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांची परफेक्ट प्रॅक्टिस रविवारी झाली. नेदरलँडविरुद्धच्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर (नाबाद 128) आणि के. एल. राहुल (102) यांची शतके आणि रोहित शर्मा (51), शुभमन गिल (61), विराट कोहली (51) यांनी अर्धशतके झळकावून भारताला 4 बाद 410 अशी जबरदस्त धावसंख्या उभी करून दिली.

या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. नेदरलँडकडून बास डी लिडेने दोन बळी घेतले. मिकरेन आणि मर्वे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने 100 धावा जोडल्या आणि या वर्षातील ही त्यांची पाचवी शतकी भागीदारी ठरली. शुभमन 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 51 धावांवर बाद झाला, तर रोहितने 54 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. विराटने त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत भारताचा डाव पुढे नेला आणि 66 चेंडूंत 71 धावा जोडल्या. 56 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 51 धावांवर कोहली त्रिफळाचीत झाला. रॉल्फ व्हॅन डर मर्वेने त्याचा त्रिफळा उडवला. वर्ल्डकपमध्ये विराट दुसर्‍यांदा फिरकीपटूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. 2015 मध्ये सिकंदर रझाने त्याची दांडी गुल केली होती.

51 धावांवर विराटचा त्रिफळा उडाला आणि बंगळूरचे स्टेडियम शांत झाले. मात्र, श्रेयसच्या आतषबाजीने ते पुन्हा दणाणले. श्रेयस व के. एल. राहुल यांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. के. एल. राहुलनेही 40 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर श्रेयसने हात मोकळे करताना अर्धशतक पूर्ण केले आणि वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून आघाडीच्या चार फलंदाजांनी पन्नास प्लस धावा करण्याची ही पाचवी वेळ ठरली. यापूर्वी 2006 (वि. इंग्लंड), 2007 ( वि. इंग्लंड), 2017 ( वि. पाकिस्तान), 2023 ( वि. पाकिस्तान) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी झाली आहे; पण वर्ल्डकप स्पर्धा इतिहासात असे प्रथमच घडले.

श्रेयसने 84 चेंडूंत वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. के. एल. राहुलनेही मग फटकेबाजी करताना शतकाच्या दिशेने वाटचाल केली. श्रेयसने 49 व्या षटकात श्रेयसने 25 धावा कुटल्या. के. एल. राहुलने 50 व्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि पुन्हा षटकार खेचून 62 चेंडूंत शतक झळकावले. त्याचेही हे वर्ल्डकपमधील पहिले शतक ठरले. तो 64 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकारांसह 102 धावांवर बाद झाला आणि श्रेयससह त्याची 208 (128 चेंडू) धावांची भागीदारी तुटली. श्रेयस 94 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह 128 धावांवर नाबाद राहिला. 20 व्या षटकापासून पॅड बांधून बसलेल्या सूर्यकुमारच्या वाट्याला शेवटचा चेेंडू आला, त्यावर त्याने दोन धावा घेतल्या. भारताने 4 बाद 410 धावा केल्या.

'सबका साथ… सबका पचास'

वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून आघाडीच्या फलंदाजांनी पन्नास प्लस धावा करण्याची ही पाचवी वेळ ठरली. यापूर्वी 2006 (वि. इंग्लंड), 2007 (वि. इंग्लंड), 2017 (वि. पाकिस्तान), 2023 (वि. पाकिस्तान) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी झाली आहे; पण वर्ल्डकप स्पर्धा इतिहासात असे प्रथमच घडले.

श्रेयस चौथ्यावरील पाचवा

वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय ठरला. सचिन तेंडुलकर (140* वि. केनिया, 1999), युवराज सिंग (113 वि. वेस्ट इंडिज, 2011), श्रेयस (101* वि. नेदरलँड, 2023), अजय जडेजा (100* वि. ऑस्ट्रेलिया) आणि विराट कोहली (100* वि. बांगला देश, 2011) यांनी हा पराक्रम केला होता.

राहुलने मोडला रोहितचा विक्रम

टीम इंडियाचा स्टार फलंदाज के. एल. राहुलने वर्ल्डकप-2023 मध्ये नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. राहुलने 64 चेंडूंत 102 धावा केल्या. राहुलने कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला असून, तो विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 62 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी रोहित शर्माने याच विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूंत शतक झळकावले होते.

रोहित सेहवागच्या पंक्तीत

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या वर्ल्डकप सामन्यात इतिहास रचला आहे. रोहित शर्मा आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 'हिटमॅन' रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

रविवारी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 12 धावा करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. रोहित शर्मापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता.

सिक्सर किंग रोहित

रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला. रोहितने बेंगळूरमध्ये नेदरलँडविरुद्ध पहिला षटकार ठोकताच, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला. डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 58 षटकार मारले होते. रोहितने त्याला मागे टाकत यावर्षी 60 षटकार ठोकले आहेत.

एका कॅलेंडर वर्षात वन-डेमध्ये सर्वाधिक षटकार

60 षटकार – रोहित शर्मा (2023*)
58 षटकार – एबी डिव्हिलियर्स (2015)

राहुलने मोडला रोहितचा विक्रम

टीम इंडियाचा स्टार फलंदाज के. एल. राहुलने वर्ल्डकप-2023 मध्ये नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. राहुलने 64 चेंडूंत 102 धावा केल्या. राहुलने कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला असून, तो विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 62 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी रोहित शर्माने याच विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूंत शतक झळकावले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news