India-Canada row | भारताने कारवाईचा बडगा उगारताच कॅनडा नरमले, ‘प्रायव्हेट चर्चे’चा सूर

India-Canada row
India-Canada row
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तानी दहशतवादी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत कॅनडातील संबध ताणले आहेत. या घटनेचे पडसाद  आज आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसतात. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रायलयाने कॅनडाला १० ऑक्टोबरला भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवण्यास सांगितले आहे. या भारताच्या कारवाईवर कॅनडाने भारतासोबत प्रायव्हेट चर्चेचा सूर व्यक्क केला आहे, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' ने दिले आहे. (India-Canada row)

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी भारत-कॅनडा या दोन्ही देशातील राजनैतिक संकट सोडवण्यासाठी नवी दिल्लीशी खासगी चर्चा करू इच्छित असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही कॅनडाच्या मुत्सद्दींच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले असून, आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. आम्ही भारताच्या संपर्कात राहू तसेच दोन्ही देशातील राजनैतिक संभाषणे खासगी राहिल्यास सर्वोत्तम असतात, असे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (India-Canada row)

भारताने कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. यानुसार कॅनडाने त्यांच्या भारतातील मुत्सद्दींना परत बोलवणे अपेक्षित आहे. कॅनडातील व्हँकुव्हर शहरात खलिस्तान समर्थक दहशतवादी निज्जर याची हत्या झाली. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताचा यात सहभाग असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारताने कॅनडाविरोधात पावल उचलण्यास अन् कारवाई करण्यात सुरूवात केली. भारतातील कॅनडाच्या राजदुतांची संख्या स्पष्ट करण्यात नाही, परंतु भारताने कॅनडाला ४१ जणांना काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. (India-Canada row)

ओटावा येथील फायनान्शिअल टाईम्समधील एका वृत्तात एका अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने असे म्हटले आहे की कॅनडाचे भारतात ६२ राजनैतिक अधिकारी आहेत. त्यापैकी ४१ लोकांना १० ऑक्टोबरपर्यंत कमी करण्यास भारत सरकारने सांगितले होते. यावर आता कॅनडाने भारतासोबत सलोखा निर्माण करत, वैयक्तिक चर्चेची मागणी केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news