IND vs SL 3rd T20 : श्रीलंकेला तिसरा झटका, अविष्का फरनँडो तंबूत परतला

IND vs SL 3rd T20
IND vs SL 3rd T20

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

श्रीलंकेला तिसरा झटका, अविष्का फरनँडो तंबूत परतला

श्रीलंकेला दुसरा झटका, निसांका तंबूत परतला

अर्शदिप सिंगने श्रीलंकेला दुसरा झटका दिला. त्याने पाथुम निसांकाला बाद केले. पाथुम निसांका १७ चेंडूमध्ये १५ धावा करत माघारी परतला.

श्रीलंकेला पहिला झटका, कुसल मेंडिस बाद

अक्षर पटेलने श्रीलंकेला पहिला झटका दिला आहे. त्याने कुसल मेंडिसला बाद केले. कुसल मेंडिस १५ चेंडूमध्ये २३ धावा करत माघारी परतला आहे

भारताने २२८ धावांचे आव्हान दिल्यानंतर श्रीलंकेने सावध सुरूवात केली आहे. ४ षटकानंतर श्रीलंकेने ३७ धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना गुजरातच्या सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २२८ धावांचा डोंगर उभा केला आहे. सूर्यकुमार यादवने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत शतकाला गवसणी घातली. त्याने ८ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण केले.

सूर्यकुमार यादवची शतकी खेळी, शुभमन गिलच्या ३६ चेंडूमध्ये ४६ धावा, राहुल त्रिपाठी १६ चेंडूमध्ये ३५ धावा केल्या. याच्या बळावरच भारतीय संघाने २२८ धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने २ विकेट्स पटकावल्या. तर कसुल रजीथा, चमिका करूणारत्ने आणि वहिंदु हसरंगा यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली. श्रीलंकेकडून वहिंदू हसरंगाने आपल्या ४ षटकांत केवळ ३६ धावा देत १ विकेट पटकावली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news