IND vs SA : नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

IND vs SA
IND vs SA

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूध्दचा दुसरा टी-२० सामना आज गुवाहटी येथे खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ राखून पराभव केला होता. (IND vs SA)

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला हाेता. सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १०६ धावा करत भारताला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले. भारताने हे आव्हान २ गडी गमावत १६.४ षटकांत पूर्ण केले हाेते. या विजयासह भारतीय संघ मालिकेत १-० आघाडीवर आहे.

या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला आहे. आफ्रिकेने एनगिडीच्या जागी शम्सीला संधी दिली आहे. तर, भारतीय संघाने आपल्या संघात कोणाताही  बदल केलेला नाही.

दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघ

भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (पंत), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news