IND vs SA T20 : भारतीय संघ जैसे थे, द. आफ्रिकेच्या संघात एक बदल

IND vs SA T20
IND vs SA T20

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.३०) टि-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकणारा संघाचा  उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने संघात एक बदल केला आहे. आफ्रिकेकडून तबरेज शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने दोनही सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेने एका सामन्यात दिमाखदार विजय मिळवला. तर आफ्रिकेचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सध्या गुणतालिकेत भारत ४ गुण मिळवत प्रथम क्रमांकावर आहे. तर द.आफ्रिकेचा संघ ३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह

दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डि कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रूसो, ॲडम मार्करम, डेव्हीड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news