IND Vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज कोएत्झी ‘आऊट’

दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी. (संग्रहित छायाचित्र)
दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. यजमान संघाचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी दुखापतीमुळे केपटाऊन कसोटीतून बाहेर पडला आहे. (IND Vs SA 2nd Test)

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने शनिवारी आपल्या अधिकृत X खात्यावर ही माहिती दिली. बोर्डाने  निवेदनात म्हटले आहे की, वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी सुपरस्पोर्ट पार्कमधील पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाली. त्‍याच्‍या ओटीपोटाचा दाह झाला.  त्‍यामुळे ताे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना जेराल्ड कोएत्झीची दुखापत वाढली. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने पाच षटकांच्या स्पेलमध्ये केवळ एक विकेट घेतली. दुखापतीमुळे तो पुढे खेळ सुरू ठेवू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव आणि 32 धावांनी जिंकला.

IND Vs SA 2nd Test : लुंगी एनगिडी आणि विआन मुल्डर यांच्‍या नावाची चर्चा

केपटाऊनमध्ये ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी सीएसएने गेराल्ड कोएत्झीच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. यजमान संघाकडे लुंगी एनगिडी आणि विआन मुल्डर हे वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत. केशव महाराजही निवडीसाठी उपलब्ध आहेत.

सेंच्युरियनमधील पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसरी कसोटी जिंकत मालिकेत बरोबरी साधण्‍याचे टीम इंडियाचे लक्ष्‍य आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. तसेच मालिकेतील पहिल्‍या कसोटी सामन्‍यातील पराभवानंतर टीम इंडिया क्रिकेट कसोटी विश्‍वचषक स्‍पर्धेत गुणतालिकेत मागे पडली आहे.

IND Vs SA 2nd Test :टेंबा बावुमाही दुसर्‍या कसोटीला मुकणार

दक्षिण आफिक्रेचा कर्णधार टेंबा बावुमा देखील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. आता तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. भारतीय फलंदाज विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह शॉट थांबवण्याच्या प्रयत्नात बावुमा जखमी झाला होता. त्यानंतर त्याला लगेच मैदान सोडावे लागले. यानंतर बावुमाच्या अनुपस्थितीत डीन एल्गरने संघाचे नेतृत्व केले. एल्गर आता ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत यजमान संघाचे नेतृत्व करेल. एल्गरचा हा शेवटचा कसोटी सामना असून यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news