पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना गुवाहाटी येथे होणार आहे, मात्र या सामन्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सामना रंगणार की नाही, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Ind Vs Sa 2nd T20)
टी 20 सामन्यावर पावसाचे ढग?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी टी-20 मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. गुवाहाटी येथे होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर असून, दुसरा सामना जिंकल्यानंतर आता मालिका जिंकण्याकडे लक्ष लागले आहे; पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामना होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ind Vs Sa 2nd T20)
Weather.Com नुसार, गुवाहाटीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत हवामान ठीक असेल; पण त्यानंतर ढगाळ वातावरण राहिल. सायंकाळी सातच्या सुमारास येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. सायंकाळनंतर पावसाची शक्यता ८० टक्क्यांपर्यंत असून, ती रात्री उशिरापर्यंत वाढेल. अशा परिस्थितीत गुवाहाटीतील हवामानामुळे सामना रद्द होऊ शकतो किंवा कमी षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या सामन्यातही पावसामुळे व्यत्यय आला होता. हा सामना ८ षटकांचा झाला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत टीम इंडिया १-० ने पुढे आहे. पहिला सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवण्यात आला होता. तो सामना टीम इंडियाने ८ विकेट्सने जिंकला होता.
हेही वाचा;