IND vs NZ Match : भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे ढग, जाणून घ्‍या हवामानाचा अंदाज

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्‍टेडियमवर रविवार, २२ ऑक्‍टोबर रोजी भारत आणि न्‍यूझीलंडमध्‍ये मुकाबला होणार आहे.
धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्‍टेडियमवर रविवार, २२ ऑक्‍टोबर रोजी भारत आणि न्‍यूझीलंडमध्‍ये मुकाबला होणार आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वन-डे विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेत टीम इंडियाची जोरदार घोडदौड सुरु आहे. या स्‍पर्धेतील पहिले चारीही सामने जिंकत संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्‍थानी आहे. भारताप्रमाणेच न्‍यूझीलंड संघाची कामगिरी दमदारपणे सूरु आहे. या संघानेही चार सामने जिकंले असून नेट रनरेटमुळे हा संघ अग्रस्‍थानी आहे. या स्‍पर्धेत हे दोनच संघ असे आहेत की, त्‍यांनी एकही सामना गमावलेला नाही. आता रविवार, २२ ऑक्‍टोबर रोजी भारत आणि न्‍यूझीलंड संघांमध्‍ये मुकाबला होणार आहे. ( Ind Vs Nz Match ) धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्‍टेडियमवर हा सामना रंगणार आहे. जाणून घेवूया येथील हवामान अंदाजाविषयी…

२०१९ मध्‍ये वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचा शेवटचा पराभव न्यूझीलंडच्‍या संघाकडूनच झाला होता. त्‍यावेळी उपांत्य फेरीत न्‍यूझीलंडच्‍या संघाने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. तो सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला हाेता.

IND vs NZ Match : सामन्यादरम्यान पावसाची शक्यता

२०१९ विश्‍वचषक स्‍पर्धेतील दोन्ही संघांमध्ये मँचेस्टरमध्ये ​​सामना झाला होता. या पावसामुळे व्यत्यय आला आणि दोन्ही संघांना राखीव दिवशी खेळावे लागले. पाऊस दोन्ही संघांची साथ सोडत नसल्याचे दिसत आहे. रविवारी धरमशाला येथे होणारा सामनाही पावसाच्या छायेत आहे. पावसासोबतच येथे जोरदार वारे वाहण्‍याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार धर्मशाळेत दुपारच्या सुमारास वेगाने वारे वाहण्‍याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. येथे दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील याआधीचा सामनाही पावसाने व्यत्यय आणला होता. तो सामना ४३ षटकांपर्यंत कमी करण्यात आला होता. धरमशाळा येथील कमाल तापमान 13 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच ७४ टक्के ढगाळ वातावरण राहील. सायंकाळपर्यंत तापमानात घट होईल आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 100 टक्के होईल, असे हवामान विभागाने म्‍हटले आहे.

IND vs NZ Match : पावसामुळे सामना रद्द झाला तर?

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यासाठी 'राखीव दिवस' ची तरतूद नाही. रविवारी सामना पावसामुळे रद्द झाल्‍यास भारत आणि न्यूझीलंड या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळेल यंदा . गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये पावसामुळे भारताचे दोन्ही सराव सामने रद्द करण्यात आले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news