IND vs NZ 1st T20 : कुलदीप यादवमुळे चहलचा पत्ता कट? जाणून घ्या कोणाला मिळणार संधी

IND vs NZ 1st T20
IND vs NZ 1st T20
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज (दि. २७) रांचीच्या मैदानावर संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. (Ind vs NZ 1st T20) टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. शिवाय आजच्या पहिल्या सामन्यासाठी दोन फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

कुलदीप यादवला मिळू शकते संधी (IND vs NZ 1st T20)

रांची येथील पहिल्या सामन्यासाठी तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. खेळपट्टीचा विचार करता संघ व्यवस्थापन फिरकीपटूंना संधी देण्याची शक्यता आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या पर्यायासाठी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. मागील सामन्यांमधील कामगिरी विचारात घेता कुलदीप यादवला संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे. (IND vs NZ 1st T20)

पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून कोण उतरणार हे हार्दिक पंड्याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हार्दिक पंड्या पत्रकार परिषदेत म्हणाला की, शुभमन गिल सलामवीर म्हणून फलंदाजी करताना दिसेल. तर दुसरा सलामीवीर म्हणून इशान किशनला संधी मिळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. (IND vs NZ 1st T20)

मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ : (IND vs NZ 1st T20)

शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव/युजवेंद्र चहल (IND vs NZ 1st T20)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news