Ravindra Jadeja : पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाचा ‘रणजी’मध्ये कहर; पटकावल्या ७ विकेट (VIDEO) | पुढारी

Ravindra Jadeja : पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाचा 'रणजी'मध्ये कहर; पटकावल्या ७ विकेट (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकामध्ये जखमी झालेल्या रवींद्र जडेजाने दमदार पुनरागमन केले आहे. जडेजा चेन्नईत सौराष्ट्रकडून खेळताना तामिळनाडू विरोधात रणजी सामना खेळत आहे. पाच महिन्यानंतर मैदानात उतरलेल्या जडेजाने दुसऱ्या डावात १७.१ षटकांमध्ये ५३ धावा देत ७ विकेट्स पटकावल्या आहेत. जडेजाच्या आक्रमक गोलंदाजीमुळे सौराष्ट्रला २६६ धावांचे आव्हान मिळाले आहे. तिसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रने १ विकेट गमावत ४ धावा केल्या. (Ravindra Jadeja)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जडेजा सज्ज (Ravindra Jadeja)

भारत पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी महत्वाची असणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ सामने जिंकावे लागणार आहेत. मालिका भारतात खेळवली जाणार असल्याने फिरकीपटूंकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. निवड समितीकडून या मालिकेसाठी फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रवींद्र जडेजाचाही समावेश आहे. मात्र, जडेजाला यासाठी फिटनेसवर काम करावे लागणार आहे. (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजा २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेत जखमी झाला होता. त्यानंतर जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षऱ पटेल ला संधी देण्यात आली होती. मात्र, असे असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ व्यवस्थापन तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतो. जडेजा शिवाय अंतिम १५ मध्ये अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवचाही समावेश आहे. (Ravindra Jadeja)

हेही वाचंलत का?

Back to top button