IND vs END 3rd Test : सरफराजच्या झंझावाती फिफ्टी पुढे रोहित-जडेजाचे शतक फिके

IND vs END 3rd Test : सरफराजच्या झंझावाती फिफ्टी पुढे रोहित-जडेजाचे शतक फिके
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून राजकोटमध्ये खेळला जात आहे. मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असल्याने तिसरा सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू असून भारताने 86 षटकांत 5 गडी गमावून 322 धावा केल्या आहेत. (IND vs END 3rd Test)

जडेजाच्या शतकाच्या धांदलीत सरफराज धावबाद

314 धावांवर भारताला मोठा धक्का बसला. रवींद्र जडेजाच्या शतकाच्या धांदलीत शानदार फलंदाजी करणारा सरफराज खान धावबाद झाला. वास्तविक, जडेजा 99 धावांवर होता. यानंतर डावाच्या 82व्या षटकात अँडरसनच्या चेंडूवर जडेजाने मिडऑनला फटका खेळला. जडेजाने सरफराजला एकेरी धाव घेण्यासाठी कॉल दिला. त्यानंतर सरफराजने धाव घेतली. पण क्षणातच जडेजाने धाव घेण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत सरफराजला मागे वळून क्रिजमध्ये पोहचण्यासाठी वेळ उरला नाही. त्याचवेळी वुडने चेंडू थ्रो करून विकेट्सा वेध घेतला. यासह सरफराज धावबद झाला. सरफराज फलंदाजीला आला तेव्हा जडेजा 153 चेंडूत 84 धावा करून फलंदाजी करत होता. यानंतर सरफराजने 66 चेंडूंत नऊ चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली, तर जडेजाने 16 धावा करण्यासाठी 45 चेंडू घेतले. अखेर जडेजाने पुढच्याच चेंडूवर एकेरी धाव घेत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक 198 चेंडूत पूर्ण केले.

भारताचे त्रिशतक

78व्या षटकात सरफराजने जेम्स अँडरसनविरुद्ध ऑफ स्टंपवर येणारा चेंडू टिपला आणि दोन धावा घेत भारताचे त्रिशतक धावफलकावर झळकावले.

सरफराजचे झंझावाती अर्धशतक

सरफराज खानने शानदार पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणाच्याच डावात अर्धशतक झळकावले. यासाठी त्याने केवळ 48 चेंडू खेळले.

जडेजा-सरफराजची पन्नासची भागीदारी

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पदार्पण कसोटी खेळत असलेल्या सरफराज खानने जडेजासह भारताच्या डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये 50 धावांची भागीदारी झाली.

कर्णधार रोहित शर्मा १३१ धावांवर बाद

५६ व्‍या षटकामध्‍ये भारताने ३ गडी गमावत २०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. शतकी खेळीनंतर कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत धावफलक हालता ठेवला. मात्र ६३ व्‍या षट्‍कात फिरकीपटू मार्क वूडला जोरदार फटका लगावताना स्‍टोक्‍सने त्‍याचा झेल घेतला. रोहितने १९६ चेंडूचा सामना करत १४ चौकार आणि ३ षटकार फटकावत १३१ धावांची खेळी केली.

कॅप्टन इनिंग..! राजकोट कसोटीत रोहित शर्माचे दमदार शतक

इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला. त्‍याने… चेंडूत… चौकार,… षटकार ठोकत स्‍मरणीय शतकी खेळी केली. त्‍याचे कारकीर्दीतील हे ११ वे कसोटी शतक ठरले आहे. आजची त्‍याची खेळी भारताच्‍या पहिल्‍या डावाला आकार देणारीही ठरली.

रोहित शर्माला अखेर सूर गवसला

तिसर्‍या कसाेटी सामन्‍यात भारताने टाॅस जिंकला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अत्‍यंत खराब झाला. भारताला पहिला धक्‍का २२ धावांवर बसला. यशस्‍वी जैस्‍वाल १० धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल शून्‍यवर तर रजित पाटीदार ५ धावांवर बाद झाला. ३३ धावांवर भारताने तीन गडी गमावले हाेते. यानंतर दडपण झुगारत राेहित शर्माने आपला नैसर्गिक खेळीला संयमाची जाेड देत ७२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एकदा सूर गवसल्‍यानंतर त्‍याने इंग्‍लंडच्‍या गाेलंदाजांचा समाचार घेत आपलं शतकही पूर्ण केले. त्‍याची ही खेळी टीम इंडियाचा आत्‍मविश्‍वास वाढविणारी ठरली. (Rohit Sharma Century )

टी- ब्रेकपर्यंत भारत ३ बाद १८५ धावा; रोहित-जडेजाची दीडशे धावांची भागिदारी

टी-ब्रेकपर्यंत भारताने तीन गडी गमावून 185 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा त्याच्या 11व्या कसोटी शतकापासून तीन धावा दूर आहे. तो 97 धावा करून क्रीजवर आहे. त्याचवेळी रवींद्र जडेजा 68 धावा करून क्रीजवर आहे. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 152 धावांची भागीदारी झाली आहे. 33 धावांच्या स्कोअरवर भारताला तिसरा धक्का बसला. तेव्हापासून आतापर्यंत रोहित आणि जडेजाने हुशारीने फलंदाजी केली आहे. जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 21वे अर्धशतक झळकावले.

पहिल्या सत्रात उपाहारापर्यंत तीन गडी गमावून भारताने ९३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सत्रात भारताने २७ षटकांत एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या. संपूर्ण सत्रात फलंदाजी करताना भारताने एकही विकेट न गमावण्याची तीन कसोटी सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे. यशस्वी जैस्वाल 10 धावा करून, शुभमन गिल खाते न उघडता आणि रजत पाटीदार पाच धावा करून बाद झाले.

रवींद्र जडेजाचे अर्धशतक; रोहितसोबत शतकी भागिदारी

सामन्यात भारताची तिसरी विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रवींद्र जडेजाने संयमी फलंदाजी केली. फलंदाजी करताने त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी रचली. हे करताना त्याने 97 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने 5 चौकार लगावले.

जडेजा-रोहितची शतकी भागीदारी

सामन्यात भारताने तीन गडी गमावून 133 धावा केल्या आहेत. तिसरी विकेट 33 धावांवर पडली होती. तेव्हापासून रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनी संयमी खेळी करत त्यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. सध्या रोहित ७३ तर, जडेजा ४१ धावांवर खेळत आहे.

रोहितचे अर्धशतक; जडेजाच्या साथीने डाव सावरला

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यातील लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात तीन गडी गमावून ९३ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 52 धावांवर नाबाद असून रवींद्र जडेजा 24 धावांवर नाबाद आहे. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 60 धावांची भागीदारी झाली आहे. यशस्वी जैस्वाल (10), शुभमन गिल (0) आणि रजत पाटीदार (5) यांच्या रूपाने टीम इंडियाला तीन धक्के बसले आहेत. मार्क वुडने दोन आणि टॉम हार्टलीने एक विकेट घेतली.

कर्णधार रोहितचे अर्धशतक

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रजत पाटीदार यांच्या रूपाने टीम इंडियाला पाठोपाठ तीन धक्के बसले. यानंतर कर्णधार रोहित शर्माने रविंद्र जडेजासोबत संयमी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये त्याने जडेजासोबत चौथ्या विकेटसाठी 92 बॉलमध्ये 57 धावांची भागिदारी केली. हा खेळी करताना रोहितने कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावले. पहिल्या दोन कसोटीत तो फार काळ मैदानावर टिकू शकला नव्हता. मात्र, या कसोटीत त्याने कठीण काळात मौल्यवान खेळी केली.

रजतच्या रूपात भारताला तिसरा धक्का

डावाच्या 9 व्या ओव्हरमध्ये रजत पाटीदारच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. रजतला टॉम हर्टलीने डकेटकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 15 बॉलमध्ये 5 धावा केल्या.

भारताला दुसरा धक्का; गिल बाद

24 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. मार्क वुडने प्रथम यशस्वीला तर, आता शुभमन गिललाही बाद केले आहे. आपल्या खेळीत शुभमन खातेही उघडू शकला नाही. सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.

भारताला पहिला धक्का

पहिल्या डावात 22 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. मार्क वुडने यशस्वी जैस्वालला स्लिपमध्ये जो रूटकडे झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 10 धावा केल्या. सध्या शुबमन गिल आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत.

सरफराज आणि ध्रुव जुरेलचे पदार्पण

सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. अनिल कुंबळे यांनी युवा खेळाडूंना पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. तर दिनेश कार्तिकने ध्रुवकडे पदार्पणाची कॅप दिली. सर्फराज हा 311 वा तर ध्रुव कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा 312वा खेळाडू आहे. यावेळी सरफराजला पदार्पणाची कॅप दिल्यानंतर तो भावूक झाला. यावेळी त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news