IND vs AUS U-19 : ऑस्ट्रेलियाचे भारताला 254 धावांचे आव्हान

IND vs AUS U-19 : ऑस्ट्रेलियाचे भारताला 254 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा एकदा आज वर्ल्डकपची फायनल रंगत आहे. या अंडर-19 संघांमध्ये होत असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 253 धावा केल्या आहेत. सामन्यात विजयसाठी 254 धावांचे लक्ष्य आहे. (IND vs AUS U-19)

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सॅमच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानीने क्लीन बोल्ड केले. आपल्या आठ बॉलच्या खेळीत सॅमला धावांचा भोपळाही फोडता आला नाही. सामन्यातील पहिल्या 10 ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी मजल मारता आली नाही. सामन्यातील 10 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 44 धावा केल्या.

नमन तिवारीचा डबल धमाका

तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध खेळी करत धावफलक हलता ठेवला. सामन्याच्या 21 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वायबगेनचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. त्याला नमन तिवारीने 48 धावांवर बाद केले. डिक्सन आणि वायबगेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.या पाठोपाठ हॅरीच्या रूपात ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला. हॅरी डिक्सन 42 धावा करून बाद झाला. सामन्याच्या 23 व्या ओव्हरमध्ये त्याला नमन तिवारीने मुरुगन अभिषेककरवी झेलबाद केले.

सामन्यातील 35व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर राज लिंबानीने रायन हिक्सला बाद केले. त्याने आपल्या खेळीत 20 धावा केल्या. हरजस सिंग आणि हिक्स यांनी चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. हॅरी बाद झाल्यानंतर हरजस सिंग आणि हिक्स यांनी संयमी खेळी करत चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागिदीरी केली. सामन्याच्या 35 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर राज लिंबानीने रायन हिक्सला बाद केले. तो 20 धावा करून बाद झाला.

एका बाजूने विकेट पडत असताना हरजस सिंग एका बाजूने आक्रमक खेळी करत होता. त्याने आपल्या खेळीत 64 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याला सौम्या पांड्येने बाद केले. हरजस सिंगल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रॉफे मॅकलिन अवघ्या 2 धावाकरून बाद झाला. त्याला मुशीर खानने झेलबाद केले.

चार्ली अँडरसनच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. तो 18 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राज लिंबानी त्याला बाद केले. निर्धारित 51 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 253 धावा केल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी 254 धावांचे लक्ष्य आहे.

भारताकडून गोलंदाजीमध्ये राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर, नमन तिवारीने 2 विकेट घेतल्या. याच्यासह पांड्ये आणि मुशीर खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news