Steve Smith : भारताविरुद्ध स्मिथला कॅप्टन बनवून ऑस्ट्रेलियाने खेळली नवी चाल

Steve Smith : भारताविरुद्ध स्मिथला कॅप्टन बनवून ऑस्ट्रेलियाने खेळली नवी चाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : steve smith captain : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसरा सामना संपल्यानंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला होता आणि तो तिसऱ्या सामन्यासाठी परतणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत माहिती दिली आहे.

कमिन्सच्या अनुपस्थितीत तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या सलग दुसऱ्या कसोटी पराभवानंतर कमिन्स गेल्या आठवड्यात सिडनीला रवाना झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमिन्सच्या आईची तब्येत ठीक नाही. (steve smith captain)

दुसरी कसोटी संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (steve smith captain) पत्नीसह काही दिवसांच्या सहलीसाठी दुबईला गेला होता. तेथे पुढील कसोटीसाठी कमिन्सच्या बाहेर होण्याच्या निर्णयाची माहिती त्याला मिळाली. 2021 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्मिथने अॅडलेडमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. ते दोन्ही सामने कांगारूंनी जिंकले होते.

कर्णधार म्हणून स्मिथची आकडेवारी (steve smith captain)

बॉल टॅम्परिंग प्रकरणात सापडण्यापूर्वी स्मिथने 2014 ते 2018 दरम्यान 34 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद भूषवले होते. तर बॉल टॅम्परिंगनंतर त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध प्रथमच संघाचे नेतृत्व केले. तो सामना ऑस्ट्रेलियाने 275 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. यानंतर 2022 मध्ये अॅडलेड कसोटीत कांगारूंनी स्मिथच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा 419 धावांनी पराभव केला होता.

कसोटी कर्णधार म्हणून स्मिथची आकडेवारी आश्वासक आहे. एकूण 36 सामन्यांपैकी संघाने 20 जिंकले असून 10 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. स्मिथने भारताविरुद्ध 8 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला असून 2 गमावले आहेत. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत दौरा 2017 मध्ये केला होता. तेव्हा स्मिथ कर्णधार होता. त्या दौऱ्यात स्मिथने तीन शतके झळकावली होती. मात्र त्या मालिकेत कांगारूंचा 2-1 पराभव झाला झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 333 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्मिथने शतक झळकावले. स्मिथने या मालिकेत सर्वाधिक 499 धावा केल्या, पण तो संघाला मालिका विजय मिळवून देऊ शकला नव्हता. यंदाचा भारत दौरा स्मिथसाठी निराशाजनक ठरला आहे. त्याने आतापर्यंत चार डावांत 23.66 च्या सरासरीने 71 धावा केल्या आहेत.

काय होते बॉल टॅम्परिंग प्रकरण (steve smith captain record)

2018 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीत कॅमेरून बॅनक्रॉफ्ट चेंडूसोबत काहीतरी करताना दिसला. नंतर त्याच्या हातात सँड पेपर असून तो बॉल घासत असल्याचे दिसून आले. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने याबाबत कबुली दिली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तत्कालीन कर्णधार स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर 12-12 महिन्यांची बंदी तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली. या प्रकरणातच स्मिथने कर्णधारपद गमावले होते.

कर्णधार म्हणून स्मिथचे फलंदाजी रेकॉर्ड (steve smith batting record)

स्मिथने 36 सामन्यांत 67.73 च्या प्रभावी सरासरीने 3,793 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 15 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 239 आहे. या कालावधीत त्याने 407 चौकार आणि 16 षटकार मारले आहेत. त्याने 6,744 चेंडूंचा सामना केला असून दोनदा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. संघाचा कर्णधार नसताना त्याने 58 कसोटीत 55.33 च्या सरासरीने 4,925 धावा केल्या आहेत.

भारताविरुद्ध स्मिथची कामगिरी

टीम इंडियाविरुद्ध स्मिथने 2013 ते 2023 या कालावधीत 16 कसोटी सामन्यांमध्ये 67.14 च्या सरासरीने 1,813 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 शतके आणि 5 अर्धशतके फटकावली आहेत. कर्णधार असताना यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 54.24 आहे. स्मिथने भारताविरुद्ध 195 चौकार आणि 10 षटकार मारले असून तो 5 वेळा नाबाद राहिला आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 192 आहे.

स्मिथची कसोटी कारकीर्द कशी राहिली?

स्मिथ कसोटीत सातत्यपूर्ण धावा करणारा खेळाडू आहे. एका दशकाहून अधिक कालावधीच्या त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 94 कसोटींमध्ये 60.12 च्या सरासरीने 8,718 धावा केल्या. दरम्यान, त्याच्या खात्यात 30 शतके आणि 37 अर्धशतके जमा झाली आहेत. सध्याच्या भारत दौऱ्यात स्मिथला आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळता आलेली नाही. त्याने यापूर्वी नागपुरात 37 आणि 25* धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याची तो 0 आणि 9 धावा करून माघारी परतला होता.

ऑस्ट्रेलियामागे दुखापतीचे ग्रहण

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमागे दुखापतीचे ग्रहण लागले आहे. तर काही खेळाडू वैयक्तीक कारणांमुळे मायदेशी परतलेत आहेत. समामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडला. हेझलवूड ऑस्ट्रेलियातून आला तसाच एकही सामना न खेळता परतला. मॅथ्यू रेनशॉ यालाही दुखपतीमुळे मायदेशी परतावे लागले. ॲश्टन एगर यालाही शेफिल्ड शिल्ड ही देशी स्पर्धा खेळायची असल्याने त्याला संघ व्यवस्थापनाने रिलीज केलं. तो ऑस्ट्रेलियाला परतला. आता कॅप्टन पॅट कमिन्स हा देखील तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे कांगारू संघ अडचणीत आला आहे.

कॅमरुन ग्रीनचे कमबॅक शक्य

तिसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन कमबॅक करू शकतात. दुखापतीमुळे ते पहिल्या दोन कसोटीत खेळू शकले नव्हते. हे दोघेही आता पूर्णपणे फिट असल्याचे समजते आहे. त्यामुळे इंदूर कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टार्क आणि ग्रीन या खेळाडूंचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news