Root-Wagner Century : एकाच चेंडूवर फलंदाज-गोलंदाजाचे शतक! रूट-वॅगनरचा अजब पराक्रम(Video)

Root-Wagner Century : एकाच चेंडूवर फलंदाज-गोलंदाजाचे शतक! रूट-वॅगनरचा अजब पराक्रम(Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Root-Wagner Century : क्रिकेटच्या मैदानावर सामन्यागणिक अनेक विक्रम घडत असतात. असाच एक अनोखा विक्रम न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान बनला आहे. वेलिंग्टन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लिश संघाचा फलंदाज जो रुटने कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक झळकावले, जे खूप खास ठरले. वास्तविक, रूटने ज्या चेंडूवर शतक साजरे केले त्याच चेंडूवर किवी गोलंदाज नील वॅगनरलाही लाजिरवाण्या शतकाला सामोरे जावे लागले.

पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यापूर्वी नील वॅगनर डावातील 65वे षटक टाकण्यासाठी आला. वॅगनरने यापूर्वी 16 षटकांत 95 धावा दिल्या होत्या, तर या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकवर आलेला जो रुटही 95 धावांवर फलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर रुटने चौकार लगावला आणि दोन्ही खेळाडूंची धावसंख्या 99 पर्यंत पोहोचवली. रूटने या धावा आपल्या बॅटमधून जमा केल्या होत्या तर वॅगनरने या धावा लुटल्या होत्या. रूटने षटकाचा शेवटचा चेंडू डीप मिड-विकेटकडे फटकावला आणि दोन धावा चोरल्या तेव्हा फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी मिळून 100 धावांचा टप्पा ओलांडला. क्रिकेटच्या इतिहासात असे फार क्वचितच घडले असेल. (Root-Wagner Century)

रुटने 101 धावांच्या या नाबाद खेळीत 182 चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये त्याने केवळ 7 चौकार मारले. या काळात हॅरी ब्रूकने (184 धावा) रूटला खंबीर साथ दिली. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 294 धावांची भागीदारी झाली. (Root-Wagner Century)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news