एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मुक्ताईनगर तालुक्यातील उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. तर या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याचे वृत्त आहे.

काय आहे प्रकरण?

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकाऱ्यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news