Income tax raid : अनिल परबांच्या ‘सीए’च्या घरावर आयकर विभागाची धाड

Income tax raid : अनिल परबांच्या ‘सीए’च्या घरावर आयकर विभागाची धाड
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या 'सीए' यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबई वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही कारवाई सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, तर दुसरी अनिल परब यांच्या सीएच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Income tax raid)

घटनास्थळी आयकर विभागाची टीम उपस्थित असून सीआयएसएफचे जवान परिसरात तैनात केले आहेत. एआयजी क्लबच्या बाजुलाच अनिल परब यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारीत त्यांचे सीए राहतात. आयकर विभागाची ही टीम अनिल परब यांच्या कार्यालयातही जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

इतकंत नाही तर, अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय कदम यांच्याही घरी आयकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. संजय कदम हे शिवसेनेचे अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत, त्यांच्याही घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. (Income tax raid)

१५ फेब्रुवारी २०२२ रोजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं आधीच जाहीर केले होते. त्यादिवशी सकाळीच ईडीने मुंबईत छापेमारी केली. दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीवर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर केलेल्या तपासाअंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जमीन खरेदीचे प्रकरण समोर आले आणि त्यांना ईडीने अटक केली हाेती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news