Maharashtra Budget : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन : Maharashtra Budget : महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला. काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. सेवा ग्रामीण व राज्य दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे. या सेवेचे परिवहन महत्त्व आणि अपरिहार्यता लक्षात घेऊन मागील दोन वर्षांत शासनाने महामंडळास कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४ हजार १०७ कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याचे अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

महाराष्ट्र अर्थसहाय्य राज्य परिवहन महामंडळासाठी पर्यावरण पूरक ३ हजार नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या १०३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरण, दर्जावाढ आणि पुनबांधणीसाठी राज्य शासनाकडून भांडवली अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच सन २०२२-२३ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता परिवहन विभागाला ३ हजार ३ कोटी, बंदरे विकासासाठी ३५४ कोटी आणि नगरविकास विभागाला ८ हजार ८४१ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news