Vladimir Putin : पुतीन यांची लघवीदेखील गोळा करतात त्यांचे बॉडीगार्ड!

Vladimir Putin : पुतीन यांची लघवीदेखील गोळा करतात त्यांचे बॉडीगार्ड!
Published on
Updated on

मॉस्को, वृत्तसंस्था : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन ( Vladimir Putin) हे जगातील एक गुढ व्यक्तिमत्त्व आहे. केजीबी या रशियाच्या तत्कालीन गुप्तहेर संस्थेचे माजी हेर आणि राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे पुतीन यांची सुरक्षाव्यवस्था सर्वतोपरी असते. त्यामुळेच परदेश दौर्‍यावर असताना त्यांचे बॉडीगार्ड पुतीन यांची लघवीदेखील (Urine) गोळा करतात आणि सुटकेसमधून ती परत रशियात आणली जाते.

एएफपी या प्रसारमाध्यमाने याबाबतची माहिती दिली आहे. या बाबतच्या अहवालात म्हटले आहे की, परदेश दौर्‍यावर असताना पुतीन यांच्यासमवेत काही स्पेशल बॉडीगार्ड असतात. या बॉडीगार्डकडे पुतीन यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची आणि त्यांच्या गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी असते. याच बॉडीगार्डस्कडे लघवीची सुटकेस असते. जोपर्यंत पुतीन ( Vladimir Putin) पुन्हा रशियात पोहोचत नाहीत तोपर्यंत ही सुटकेस या बॉडीगार्डस्च्या ताब्यात असते.

रशिया-युक्रेन युद्धावेळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आरोग्यावरून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत होते. काही रिपोर्टस्मध्ये पुतीन यांना कॅन्सर असल्याचे म्हटले गेले होते तर काहींमध्ये त्यांना मानसिक आजार असल्याचा दावा केला होता. पुतीन यांना डिमेन्शिया आणि पार्किन्सन्स असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.

आरोग्याच्या तक्रारी कळू नयेत हा उद्देश ( Vladimir Putin) 
रशियन सुरक्षा यंत्रणा पुतीन यांच्या आरोग्याबाबत खूपच सतर्क असतात. पुतीन यांच्या आरोग्यविषयक तक्रारी, आजार कुणालाही कळू नयेत, जगासमोर येऊ नयेत आणि लघवीद्वारे त्यांच्या आरोग्यविषयक सर्व बाबी उघड होऊ शकतात, अशी भीती रशियाला वाटते.

फ्रेंच पत्रकाराचा दावा ( Vladimir Putin) 
फ्रान्सचे मासिक 'पॅरिस मॅच'मध्येही पत्रकार रेजिस जेन्ते यांनी रशियाविषयी दोन पुस्तके लिहिली आहेत. ते म्हणाले की, पुतीन यांची लघवी गोळा करण्यासाठी फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसचे एजंट नेमलेले असतात आणि एका स्पेशल बॅगमधून ही लघवी पुन्हा रशियात पाठवली जाते. 2019 मध्ये पुतीन सौदी दौर्‍यावर गेले होते तेव्हा त्यांचे बॉडीगार्ड त्यांच्यासोबत बाथरूममध्येही जात होते, तेव्हा ही बाब समजली.

परदेश दौर्‍यात पोर्टेबल टॉयलेटचा वापर
2017 मध्ये फ्रान्स (France) दौरा आणि 2019 मध्ये सौदी अरेबिया (Saudi Arabia) दौर्‍यात पुतीन यांच्यासोबत छोटे पोर्टेबल टॉयलेट होते. पुतीन सत्तेत आल्यापासूनच स्वतःसोबत टॉयलेट ठेवत असल्याचेही सांगितले जाते. 2019 मध्येही पॅरिसमधील युक्रेन समिटमध्ये पुतीन हे सहा बॉडीगार्डसह बाथरूममध्ये जाताना दिसले होते. यातील एक बॉडीगार्ड पुतीन बाथरूममधून बाहेर पडताच आत गेला होता. व्हिएन्नामधील एका म्युझियमध्येदेखील पुतीन पोर्टेबल टॉयलेटसह आले होते, असे येथील स्टाफने सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news