Imran Khan : पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यामुळे इमरान खान यांनी मोदींचं केलं कौतुक

Imran Khan : पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यामुळे इमरान खान यांनी मोदींचं केलं कौतुक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी केले होते, त्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी मागील काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारचे कौतुक केले होते. "मोदी सरकारने जी परराष्ट्र नीती स्वीकारली तशीच पाकिस्तानने स्वीकारयला हवी होती", असा टोला पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) पुरुस्कृत सरकारवर लगावत इमरान खान (Imran Khan) यांनी आता पुन्हा एकदा भारतात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्यामुळे त्यांचं तोंडभरून कौतुक केले आहे.

पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ (पीटीआय) च्या नेत्यांनी इंधन दरवाढ कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाची माहिती देत ट्विट केले आहे की, "क्वाडचा भाग असूनही भारत अमेरिकेच्या दबावापासून स्वतःला वेगळा ठेवून आणि जनतेला दिलासा देण्यासाठी भारताने रशियाकडून तेल खरेदी केले. भारताने स्वतंत्र परराष्ट्र नीतीसंदर्भात जे करून दाखविलं ते करण्यात आपलं सरकार कमी पडत आहे. त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही मुंडकं नसलेल्या कोंबड्यासारखी झाली आहे."

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरचे केंद्रीय अबकारी कमी केले आहे, त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये ९.५ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलच्या किमतीमध्ये ७ रुपये प्रतिलीटर कमी करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे रशियावर पश्चिमेकडील देशांनी अनेक प्रतिबंध लावलेले असताना भारताने रशियाकडून तेल आयात केलेले आहे.

राॅयटर्सच्या अहवालानुसार भारताने महागाईविरोधात लढण्यासाठी रशियाकडून वेगाने तेल खरेदी केले. त्यामुळे एप्रिल महिन्यात देशातील कच्च्या तेलाची आयात ही साडेतीन वर्षांच्या तुलनेत उच्चस्तरावर पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इमरान खान यांनी पाकिस्तानच्या सरकारवर सडकून टीका केली.

इमरान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, "पाकिस्तानच्या विद्यमान सरकारने मोदी सरकारसारखी भूमिका घेत पाकिस्तानच्या जनतेला दिलासा द्यायला हवा होता. मात्र, मीर जाफर आणि मीर सादिक सत्ता परिवर्तनासाठी बाहेरच्या दबावापुढे झुकले. आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित हे अग्रस्थानी होते. मात्र, दुर्दैवाने स्थानिक एमआय जाफर्स आणि मीर सादिक सत्ता परिवर्तनासाठी बाहेरच्या दबावापुढे नमली. त्यामुळे आता मुंडकं नसल्यामुळे कोंबड्यासारखी पाकिस्तान अर्थव्यवस्था झाली आहे."

पहा व्हिडीओ : संभाजीराजेंनी केली नव्या संघटनेची घोषणा | युवराज संभाजीराजे छत्रपती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news