इम्रान खान यांनी केला दाेन प्रांतात सत्ता स्‍थापनेचा दावा

Imran Khan Bail
Imran Khan Bail

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तान राष्ट्रीय संसद आणि प्रांतीय विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्‍यानंतर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नसल्‍याने सत्तासंघर्षाचा तिढा कायम राहिला आहे 101 जागा जिंकलेल्‍या अपक्ष उमेदवारांनी खैबर पख्तूनख्वा किंवा पंजाब प्रांतात सत्ता स्‍थापन करावी, अशी इच्‍छा इम्रान खान यांनी व्‍यक्‍त केली आहे.  यासाठी इम्रान खान यांच्‍या तहरिक-ए-इन्‍साफ ( पीटीआय) पक्षाने अनेक विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्‍या आता पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआय सरकार स्थापन करण्यासाठी धोरण आखतील, असे वृत्त असे वृत्त पाकिस्‍तानमधील दैनिक 'द डाॅन'ने दिले आहे. दरम्‍यान, सत्ता स्‍थापनेसाठी ७५ जागा जिंकलेल्‍या नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) (पीएमएलएन) आणि ५४ जागांवर समाधान मानाव्‍या लागलेल्‍या बिलावल भुट्टो यांच्‍या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्‍यात चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पीटीआयने समर्थित 101 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत आणि पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्यांच्या पक्षाला रोखण्याचा आणि पक्षावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र देशातील जनतेचा इम्रान खानवर विश्वास असून, त्यांनी आपल्या मतांनी इम्रान खान यांना देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले आहे, असे 'पीटीआय'ने निवेदन जारी केले आहे.

'तहरिक'च्‍या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

पीटीआय'ने निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला असून, त्यांच्या नेत्यांनी याबाबत राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली. पीटीआयचा आरोप आहे की निवडणूक निकालांच्या मतमोजणीच्या वेळी ते 170 नॅशनल असेंब्लीच्या जागांवर आघाडीवर होते, परंतु त्यानंतर ही निवडणूक पीएमएल-एनच्या बाजूने बदलण्यात आली.

पीएमएल-एन आणि पीपीपी या दोन्ही पक्षांमधील युतीबाबत अंतिम निर्णय घेण्‍यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीपीपीचे बिलावल भुट्टो झरदारी आणि इतर अनेक पक्ष नेते पीएमएल-एनसोबत युती करण्याच्या बाजूने नाहीत आणि पीपीपीने पीटीआयसोबत विरोधी पक्षात बसावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, आसिफ अली झरदारी सत्तेच्या वाटणीच्या बाजूने आहेत आणि ते पीएमएल-एनच्या नेत्यांशी चर्चा करत असल्‍याचेही वृत्त आहे.

101 जागा जिंकलेल्‍या अपक्ष उमेदवारांनी  खैबर पख्तूनख्वा किंवा पंजाब प्रांतात सत्ता स्‍थापन करावी, अशी इच्‍छा इम्रान खान यांनी केली आहे. त्‍यांच्‍या तहरिक-ए-इन्‍साफ ( पीटीआय) पक्षाने अनेक विशेष समित्या स्थापन केल्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news