पाकिस्‍तान कंगाल होण्‍यास भारत नव्‍हे, देशातील लष्‍करच जबाबदार : नवाज शरीफ | पुढारी

पाकिस्‍तान कंगाल होण्‍यास भारत नव्‍हे, देशातील लष्‍करच जबाबदार : नवाज शरीफ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानच्‍या आर्थिक संकटास भारत आणि अमेरिका जबाबदारी नाही तर आम्‍हीच आमच्‍या पायावर कुर्‍हाड मारुन घेतली आहे. देशातील लष्‍करामुळेच पाकिस्‍तान आर्थिकदृष्‍ट्या कंगाल झाला आहे, असा हल्‍लाबोल माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) प्रमुख नवाज शरीफ यांनी केला.

२०१८ च्‍या निवडणुकीत लष्‍कराने हेराफेरी केली

लंडनवरुन दीर्घ विश्रांतीनंतर मायदेशात परतलेले नवाज शरीफ आगामी निवडणुकीच्‍या तयारीत आहे. एका मुलाखतीत त्‍यांनी म्‍हटलं की, पाकिस्तान आज आर्थिकदृष्‍ट्या कंगाल झाला आहे. याला भारत, अमेरिका किंवा अफगाणिस्तान जबाबदार नाही. तर आम्‍हीच आमच्‍या पायावर कुर्‍हाड मारुन घेतली आहे. देशातील लष्‍कराने २०१८ च्‍या निवडणुकीत हेराफेरी केली. त्यांचे ‘निवडलेले’ (इम्रान खान) यांना देशाचे पंतप्रधान म्‍हणून लादले. याचा त्रास जनेतला भोगावा लागला देशाची अर्थव्‍यवस्‍था पूर्णपणे कोलमडली.

न्यायाधीशांकडून लष्करी हुकूमशहांचे समर्थन

देशातील न्‍यायाधीश लष्करी हुकूमशहांचे समर्थन करतात. ते संविधानाची मोडतोड करतात. अप्रत्‍यक्षपणे लषक्‍राच्‍या शासनाला वैधता प्रदान करतात. पंतप्रधान पदावर असणार्‍या व्‍यक्‍तीची हकालपट्टी करण्यास मान्यता देतात. न्यायाधीशांनी संसद विसर्जित करण्याच्या कायद्यालाही मान्यता आहे का?, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.

‘आयएसआय’च्या माजी प्रमुखावरही साधला निशाणा

नवाझ शरीफ यांनी 2017 मध्ये पाकिस्‍तानची गुप्‍तचर संघटना   आयएसआयचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांना सत्तेतून काढून टाकण्याच्या भूमिकेबद्दल निशाणा साधला. ते म्हणाले, ‘त्या लोकांविरुद्ध (फैज हमीद आणि इतर) सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू करण्यात आला आहे. त्‍यांनी म्हटले होते की, नवाज तुरुंगातून बाहेर आला तर त्यांची दोन वर्षांची मेहनत वाया जाईल.’

सकाळी पंतप्रधान होतो, सायंकाळी दरोडेखोर म्‍हणून घोषित केले…

नवाज शरीफ यांनी म्‍हटले आहे की, 1999 मध्ये मी सकाळी पंतप्रधान होतो आणि सायंकाळी मला दरोडेखोर घोषित करण्यात आले. 2017 मला सत्तेतून काढून टाकण्यात आले. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे प्रमुख इम्रान खान यांचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘त्यांनी (लष्करी आस्थापने) हा निर्णय घेतला कारण त्यांना त्यांच्या निवडलेल्या व्यक्तीला सत्तेवर आणायचे होते, असा दावाही त्‍यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button