Pakistan inflation : पाकिस्तानातील महागाईला इम्रान खान सरकार जबाबदार !!!

Pakistan inflation : पाकिस्तानातील महागाईला इम्रान खान सरकार जबाबदार !!!
Published on
Updated on

इस्लामाबाद, पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानमधील वाढत्या महागाईला (Pakistan inflation) आणि बेरोजगारीला इम्रान खान सरकारची अकार्यक्षमता जबाबदार असल्याचे मत पाकिस्तानातील ५० टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. बुधवारी इंटरनॅशनल ट्रान्स्परन्सीकडून 'नॅशनल करप्शन पर्सेप्शन सर्वे २०२१' प्रसिद्ध करण्यात आला, त्यात ही माहिती देण्यात आली.

डाॅनने सर्वेक्षणाचा हवाला देत असं म्हंटलं आहे की, पाकिस्तानातील ५०.६ टक्के लोक देशातील महागाईला (Pakistan inflation) इम्रान खान यांच्या सरकारला जबाबदार ठरवत आहेत, तर २३.३ टक्के पाकिस्तानी लोक महागाईला आर्थिक संकट कारणीभूत असल्याचे मानतात. १६.६ टक्के पाकिस्तानी लोकांची मत असं आहे की, धोरणांचा अंमलबजावणी व्यवस्थिन न झाल्याने महागाई वाढलेली आहे.

सर्वेक्षणानुसार ६६.८ टक्के पाकिस्तानी लोकांनी वर्तमान सरकारलाच या महागाईविषयी जबाबदार ठरवले आहे. हे सर्वेक्षण १४ ते २७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेण्यात आला. त्यामध्ये १६०० पाकिस्तानी लोकांनी आपलं मत नोंदवलं. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार या सर्वेमध्ये सरकारमधील अनेक विभागांना भ्रष्टाचारी ठवलेलं आहे.

त्यामध्ये पोलीस विभाग पहिल्या स्थानावर आहे. न्यायालयीन व्यवस्था दुसऱ्या स्थानावर, तिसऱ्या स्थानावर निविदा आणि कंत्राटी विभाग आणि चौथ्या स्थानावर आरोग्य विभाग असून या विभागांमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होत आहे, असंही लोकांनी नमूद केलेलं आहे.

न्यायालयीन खटल्यांची माहिती देताना डाॅनने म्हंटलं होतं की, नॅशनल ज्युडिशियल कमिटीच्या ज्युडिशियल स्टॅटिस्टिक्स २०२० च्या अहवालानुसार ४६ हजार ६९८ खटले पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, तर १ कोटी ७७ लाख २ हजार ९९० खटले जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत. पाकिस्तानातील भ्रष्ट व्यवस्था आणि महागाईविरुद्ध पाकिस्तानी जनता निषेध करत आहे.

पहा व्हिडीओ : जनरल बिपीन रावत : गोरखा रायफल्‍स ते देशाचे पहिले सीडीएस | Bipin Rawat | CDS

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news