हाडांच्या दुर्मीळ कर्करोगावर इम्युनोथेरपी वरदान

हाडांच्या दुर्मीळ कर्करोगावर इम्युनोथेरपी वरदान
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एविंग सारकोमा अर्थात हाडांचा दुर्मीळ कर्करोग 10 ते 20 वर्षे वयोगटामध्ये आढळून येतो.  आजाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, अमेरिकन वंशाची आशियाई लोकसंख्या असलेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येतो. सारकोमाचा धोका स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. टार्गेटेड इम्युनोथेरपीमुळे हाडांच्या कर्करोगाच्या नियंत्रणाबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. सारकोमा हा हाडांच्या कर्करोगाची समस्या प्रामुख्याने पायामध्ये आढळून येते. काही वेळा पोट, छातीमध्येही कर्करोग उद्भवू शकतो.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या अहवालानुसार, भारतात दिल्ली, महाराष्ट्र, बंगळुरु आणि भोपाळमध्ये सारकोमाचे रुग्ण आढळून येतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी या उपचारांच्या माध्यमातून सारकोमावर मात करता येऊ शकते, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. किरण खरात यांनी दिली. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमांतर्गत भारतातील लोकसंख्या आधारित कर्करोग नोंदणीचा आढावा घेतला जातो. यामध्ये सारकोमाचे प्रमाणही नियमितपणे तपासले जाते. हाडांचा हा कर्करोग सुमारे 95 वर्षांपूर्वीचा असला तरी त्याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे.
वेदनादायी सूज, ताप, थकवा, वजन कमी होणे अशी लक्षणे या आजारामध्ये पहायला मिळतात. एविंग सारकोमासाठी शस्त्रक्रिया ही महत्त्वाची उपाययोजना मानली जाते. यामध्ये ट्यूमर आणि आसपासची ऊतके (टिश्यू) काढली जातात. कर्करोगाच्या पेशींची अनियंत्रित वाढ होत असल्यास रेडिएशन थेरपीने पेशी मारल्या जातात. टार्गेडेड थेरपीमध्ये कर्करोगाच्या विशिष्ट औषधांचा वापर करून पेशींची वाढ थांबवली जाते.
                                                     – डॉ. किरण खरात,  वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, रुबी हॉल क्लिनिक
हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news