IIT Kanpur Professor : ‘आरोग्या’विषयी मार्गदर्शन करताना IIT कानपूरच्या प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

IIT Kanpur Professor
IIT Kanpur Professor

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात 'आरोग्या'विषयी मार्गदर्शन करताना IIT कानपूरच्या प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समीर खांडेकर असे मृत्यू झालेल्या ५५ वर्षीय वरिष्ठ प्राध्यापकाचे नाव असून ही घटना शुक्रवारी (दि.२४) आयआयटी कानपूरच्या सभागृहात घडली, या संदर्भातील 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (IIT Kanpur Professor)

कानपूर आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्राध्यापक समीर वानखेडे हे माजी विद्यार्थ्यांना 'आरोग्या'विषयी मार्गदर्शन करत होते. दरम्यान तुमच्या 'आरोग्याची काळजी घ्या' असे म्हणताच खांडेकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांच्या छातीत दुखू लागले. दरम्यान, ते खाली बसले परंतु प्रेक्षक विद्यार्थ्यांना ते भावनिक झाल्याचे वाटले; पण काही वेळाने त्यांच्या चेहऱ्याला घाम फुटला आणि ते स्टेजवर कोसळले.

खांडेकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉ नीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार खांडेकर यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात वरिष्ठ प्राध्यापक खांडेकर यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने किंवा कार्डियाक ब्लॉकमुळेच झाला आहे, असे देखील 'इंडिया टुडे'ने म्हटले आहे. (IIT Kanpur Professor)

समीर खांडेकर यांच्या आरोग्याचा इतिहास पाहता, त्यांना २०१९ पासून कोलेस्ट्रॉलचा त्रास होता आणि त्यांच्यावर सतत औषधोपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी ( दि.२२) त्यांचा हृदयविकाराचा झटका आला. यानंतर रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. खांडेकर यांचा मुलगा केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असून, तोच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करेल, असे त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. (IIT Kanpur Professor)

कानपूर आयआयटीचे वरिष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. खांडेकर यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक केले आणि पीएचडीसाठी ते जर्मनीला गेले. त्यानंतर २००४ मध्ये आयआयटी कानपूरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक झाले. नंतर त्यांची मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख आणि विद्यार्थी कल्याण डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या नावावर आठ पेटंट्सही आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news