मुंबई; पुढारी ऑनलाईन : जगभरात नोकरकपातीची लाट सुरु असताना भारतात मात्र नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमधून नोकरीच्या मोठ्या प्रमाणात ऑफर्स मिळाल्या आहेत. आयआयटी मुंबई येथे प्लेसमेंट सत्राच्या नवव्या दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना १,५०० ऑफर्स मिळाल्या आहेत. या प्लेसमेंट राउंडमध्ये रिलायन्स, अदानी आणि टाटा समूह आदी भारतीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, या प्लेसमेंट राउंडमध्ये ४४ कंपन्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी टीएसएमसी (TSMC), मॅककिन्से अँड कंपनी (McKinsey & Company), अमेरिकन एक्स्प्रेस (American Express), बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (Boston Consulting Group), होंडा जपान (Honda Japan), मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) हे टॉप रिक्रूटर्स होते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या १,५०० ऑफर्सपैकी ७१ ऑफर्स ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. तर २५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेजच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. २०२१-२२ च्या सत्रात एकूण ६६ आंतरराष्ट्रीय ऑफर्स मिळाल्या होत्या. पण सध्याच्या सत्रात ९ दिवसापर्यंत ७१ आंतरराष्ट्रीय ऑफर्स मिळाल्या असल्याची माहिती एका प्लेसमेंट समिती सदस्याने Business Today शी बोलताना दिली आहे.
नवव्या दिवसांपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण १,५०० ऑफर्सपैकी १,२२४ ऑफर्स स्वीकारल्या गेल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ७१ पैकी ६३ ऑफर स्वीकारल्या आहेत. मध्य पूर्व आशियातूनही नोकऱ्यांचा ऑफर्स मिळाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटच्या बहुतांश ऑफर्स ह्या जपान, तैवान, दक्षिण कोरिया, आणि सिंगापूर येथून मिळाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
IIT Bombay च्या २०२१-२२ प्लेसमेंट रिपोर्टनुसार, शेवटच्या प्लेसमेंट सत्रात विद्यार्थ्यांना मिळालेल्या बहुतांश आंतरराष्ट्रीय ऑफर्स अमेरिका, नेदरलँड्स, यूएईमधून होत्या.
हे ही वाचा :