IFFI Goa 2023 : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मनाला समाधान देऊन गेला : दिग्दर्शक सुदीप्तो सेन

IFFI Goa 2023 : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मनाला समाधान देऊन गेला : दिग्दर्शक सुदीप्तो सेन

पणजी :  'द केरला स्टोरी' हा चित्रपट संशोधनानंतर तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे कथानक ज्यावेळी आपण ऐकले. त्यानंतर त्या कथानकाची सत्यता तपासली आणि हे कथानक सत्य वाटल्यामुळेच आपण हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाने आपल्या मनाला समाधान दिले, असे प्रतिपादन 'द केरला स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केले. (IFFI Goa 2023)

'द केरला स्टोरी' हा चित्रपट इंडियन पेनोरमा विभागात आज ( दि.२७) दाखवण्यात आला. रेड कार्पेटवर बोलताना सेन म्हणाले की, एक दिग्दर्शक म्हणून रसिकांचे समाधान करणारे चित्रपट तयार करणे, हे आपले कर्तव्य ठरते. आणि जर चांगले कथानक मिळत असेल तर आपण कुठल्याही विषयावर चित्रपट करतो. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट केल्यानंतर बरेच वादविवाद झाले, मात्र आपणाला तो चित्रपट समाधान देणारा ठरला, असेही सेन म्हणाले. (IFFI Goa 2023)

चेन्नईमध्ये १९९२ मध्ये इफ्फीला आपण उपस्थित होतो. गोव्यात दुसर्‍यांदा आलो. गोव्यामध्ये ईफ्फीचे चांगले आयोजन होत असून स्थळेही चांगली असल्याचे सेन म्हणाले. विपुल शहा यांनी 'या' चित्रपटातून सत्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि लोक जागृत व्हावेत, यासाठी आपण या चित्रपटाची निर्मिती केल्याचे सांगितले. तर प्रमुख कलाकार प्रणव मिश्रा यांनी आपला हा पहिला अनुभव असल्याचे सांगून चित्रपट करताना आपणास मजा आली. चित्रपटालाही चांगली प्रसिद्धी मिळाली. आपण इथे पहिल्यांदा आलो असल्याचे सांगितले. यावेळी सहनिर्माचे रोहित चौधरी उपस्थित होते.

धर्मांतराचे सत्य

विविध विचार मनात भरवून मुलीचे धर्मांतर करून त्यांना अफगाणिस्तानमार्गे सिरीयात पोहोचवणार्‍या दहशतवादी कारस्थानाचा भांडाफोड करणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटगृहात आज (सोमवारी) हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. केरळ राज्यात सुरू असलेले धर्मांतर आणि तेथील सुमारे ५० हजार मुलींचे गायब होणे, यावर हा चित्रपट भाष्य करतो. उत्कृष्ट चित्रीकरण व दिग्दर्शऩामुळे हा चित्रपट बराच परिणामकारक झाला आहे. (IFFI Goa 2023)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news