पुढारी ऑनलाईन डेस्क : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला करायचा होता, तर तो मातोश्रीवर करायचा होता, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज (शनिवार) येथे उधळली. या विधानामुळे आमदार पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा एसटी कर्मचारी आंदोलनाशी काही संबंध नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी दगडफेक, चप्पलफेक करण्यात आल्याने मोठा गदारोळ माजला होता. या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निषेधार्थ मूक आंदोलन केले. दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने या आंदोलन प्रकरणी बोलताना हल्ला करायचा होता तर तो मातोश्रीवर करायचा होता, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का ?