Omisure Kit : ओमायक्रॉनचं १० ते १५ मिनिटांत होणार निदान; ओमिश्यूअर कीटला आयसीएमआरकडून परवानगी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या व्हेरिएंटचे लवकरात लवकर निदान करणारी एक कीट टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक कंपनीने तयार केले आहे. ओमिश्यूअर (Omisure Kit) नावाच्या या कीटला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) नुकतीच परवानगी दिली आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. त्यानंतर जगभरात त्याचा झपाट्याने फैलाव होत आहे. कोरोना रुग्णात या व्हेरिएंटचा विषाणू आहे की नाही, हे शोधण्यासाठी प्रामुख्याने जिनोम सिक्वेन्सिंग करावे लागते. मात्र ओमिश्यूअर कीटमुळे कमी वेळेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेता येईल, असे मानले जात आहे.

Omisure Kit : कशी होणार तपासणी, किती वेळात मिळेल रिपोर्ट

ओमिश्यूअर टेस्ट कीट अन्य आरटी-पीसीआर टेस्ट कीट प्रमाणेच काम करेल. या कीटच्या माध्यमातून तपासणीसाठी नाक अथवा घशातील स्वॅब घेतला जाईल. त्यानंतर १० ते १५ मिनिटांत रिपोर्ट येईल. ओमिश्यूअर टेस्ट कीट तपासणी अन्य आरटी-पीसीआर टेस्ट पेक्षा वेगळा नाही.

ओमायक्रॉन रुग्णसंख्या १,८९२ वर

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १,८९२ रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वांधिक महाराष्ट्रातील ५६८ रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत ३८२, केरळमध्ये १८५ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांपैकी ७६६ रुग्ण ओमायक्रॉन मधून बरे झाले आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news