David Warner New Record : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील ‘हा’ विक्रम

David Warner New Record : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील ‘हा’ विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner New Record : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने ही विक्रमी कामगिरी केली. 19 सामन्यांच्या 19 डावांत त्याने आतापर्यंत 1033 धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात तो 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावांवर बाद झाला.

तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्सला टाकले मागे (David Warner New Record)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईतील मैदानावर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कांगारूंचे सलामीवीर मैदानात उतरले. यावेळी वैयक्तीक आठवी धाव घेताच वॉर्नरने विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. याशिवाय वॉर्नरने भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी विश्वचषकात सर्वात जलद हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (20 डाव) आणि एबी डिव्हिलियर्स (20 डाव) यांच्या नावावर होता, मात्र आता हा विक्रम वॉर्नरने आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे आता तेंडुलकर आणि एबीडी हे दोघेही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज (David Warner New Record)

विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वॉर्नरने तिसरे स्थान पटकावले आहे. त्याने मार्क वॉचा विक्रम मोडला. वॉने एकदिवसीय विश्वचषकात 1004 धावा केल्या होत्या. विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रिकी पॉन्टिंग आघाडीवर आहे असून त्याने 1743 धावा केल्या आहेत. (David Warner New Record)

वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू

1743 : रिकी पाँटिंग
1085 : अॅडम गिलख्रिस्ट
1033* : डेव्हिड वॉर्नर*
1004 : मार्क वॉ
987 : मॅथ्यू हेडन

आयसीसी वनडे विश्वचषकात सर्वात कमी डावात 1000 धावा पूर्ण करणारे फलंदाज

19 डाव : डेव्हिड वॉर्नर
20 डाव : सचिन तेंडुलकर/एबी डिव्हिलियर्स
21 डाव : विव्ह रिचर्ड्स/सौरव गांगुली
22 डाव : मार्क वॉ
22 डाव : हर्शल गिब्स

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news