Rohit Sharma Record : रोहित शर्माने मैदानात उतरताच रचला इतिहास! अझरुद्दीन-द्रविड-धोनीला टाकले मागे | पुढारी

Rohit Sharma Record : रोहित शर्माने मैदानात उतरताच रचला इतिहास! अझरुद्दीन-द्रविड-धोनीला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक सामना खेळण्यासाठी चेन्नईच्या मैदानात उतरताच त्याने नवा इतिहास रचला. रोहितने एकही चेंडू न खेळता सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदवले. रोहितचे वय 36 वर्षे 161 दिवस आहे. अशा परिस्थितीत तो एकदिवसीय विश्वचषक खेळणारा भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता, ज्याने 1999 साली 36 वर्षे 124 दिवस वय असतना संघाचे नेतृत्व केले होते.

विश्वचषक स्पर्धेतील भारतासाठी सर्वात वयस्कर कर्णधार (Rohit Sharma Record)

36 वर्षे 161 दिवस : रोहित शर्मा (2023)*
36 वर्षे 124 दिवस : एम. अझरुद्दीन (1999)
34 वर्षे 71 दिवस : राहुल द्रविड (2007)
34 वर्षे 56 दिवस : एस. वेंकटराघवन (1979)
33 वर्षे 262 दिवस : एमएस धोनी (2015)

अझरुद्दीन, द्रविड आणि धोनीला टाकले मागे (Rohit Sharma Record)

मोहम्मद अझरुद्दीनने 1992, 1996, 1999 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. या यादीत राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2007 च्या विश्वचषकादरम्यान द्रविडचे वय 34 वर्षे 71 दिवस होते. एस वेंकटराघवन यांनी 1975 आणि 1979 विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे. त्यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. 1979 च्या विश्वचषक सामन्यात त्याचे वय 34 वर्षे 56 दिवस होते.

धोनी पाचव्या क्रमांकावर

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनी पाचव्या स्थानावर आहे. 2015 च्या विश्वचषकात त्याने अखेरच्या वेळी टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी धोनीचे वय 33 आणि 262 वर्षे होते. रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार बनवण्यात आले तेव्हा तो 34 वर्षांचा होता. डिसेंबर 2021 मध्ये विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर रोहितला कर्णधार बनवण्यात आले.

रोहित 2022 पासून टी-20 खेळलेला नाही पण असे असूनही तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार आहे. रोहितच्या कर्णधारपदाचे भवितव्य 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकावर अवलंबून आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2022 चा टी-20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गमावली आहे.

रोहितचे वनडेतील आतापर्यंतचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10112 धावा केल्या आहेत. रोहितची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 264 आहे. त्याने 30 शतके आणि 52 अर्धशतके फटकावकी आहेत. रोहितने एकदिवसीय सामन्यांच्या 38 डावांमध्येही गोलंदाजी केली आहे. त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. रोहितने टीम इंडियासाठी 52 कसोटी आणि 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

वर्ल्ड कप 2023 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. न्यूझीलंडने तो 9 गडी राखून जिंकला. दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात झाला. पाकिस्तानने हा सामना 81 धावांनी जिंकला.

Back to top button