पराभवाचे ‘साईड-इफेक्ट’..! पाकिस्‍तानी खेळाडूंनी हॉटेल्समध्ये जाणे टाळले! ‘ऑनलाईन’ मागवली बिर्याणी


कर्णधार बाबरसह पाकिस्‍तान क्रिकेट संघातील काही खेळाडू. ( संग्रहित छायाचित्र)
कर्णधार बाबरसह पाकिस्‍तान क्रिकेट संघातील काही खेळाडू. ( संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासह चार सामने पराभूत झालेला पाकिस्तान क्रिकेट संघावर चौफेर टीका सुरु आहे. अशातच पाकिस्‍तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी ) आणि संघाचा वादही समोर आल्‍याचे वृत्त आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ हे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्याशी संवाद खंडित केला असून, ते त्‍याचा फोन उचलत नसल्याच्याही चर्चा रंगली आहे. आता संघातील खेळाडूंनी काेलकातामध्‍ये प्रसिद्ध हॉटेल्समध्ये जाणे टाळत 'ऑनलाईन' बिर्याणी मागवल्‍याचे वृत्त आहे.  ( Pakistan Cricket Team )

खेळाडूंनी फूड डिलिव्हरी ॲपवरून मागवली बिर्याणी आणि कबाब

पाकिस्तानचा संघ आत्तापर्यंत जिथे जिथे खेळायला गेला आहे तिथे त्या शहरातील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये जेवणाचा आनंद लुटला आहे. मात्र, कोलकात्यातील टीम शहरात बाहेर जेवायला गेली नाही, तर फूड डिलिव्हरी  ॲपवरून जेवण ऑर्डर केले. संघातील खेळाडूंनी हॉटेलमध्ये सर्वांसोबत जेवण करणे टाळले. ऑनलाईन बिर्याणी आणि कबाब मागविण्‍यात आलेल्‍या रेस्टॉरंटच्‍या संचालकाने सांगितले की, ही ऑर्डर पाकिस्तान क्रिकेट संघाची आहे याची आम्‍हाला कल्‍पना नव्‍हती; परंतु नंतर याबाबत माहिती मिळाली. कोलकात्याची बिर्याणी जग प्रसिद्ध आहे. पाकिस्‍तान संघाच्‍या खेळाडूंनी याची ऑर्डर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे मागवली होती. ( Pakistan Cricket Team )

Pakistan Cricket Team: वसीम अक्रम यांनी केली होती बोचरी टीका

पाकिस्तानी संघातील खेळाडूंच्‍या खाण्याच्या सवयी आणि फिटनेसबाबत माजी कर्णधार वसीम अक्रम याने नुकतीच बोचरी टीका केली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संघ मैदानावर सुस्त असल्याची टीका अक्रमने केली होती. "रोज ८ किलो मटण खाताय, पण फिटनेस कुठे?," असा सवालही त्‍याने केला होता.

पाकिस्तानचा सामना बांगलादेशबरोबर

पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेतील आव्‍हान जवळपास संपुष्‍टात आल्‍यासारखे आहे. पाकिस्‍तानचा संघ चार पराभव आणि दोन सामन्‍यातील विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. कोलकातामध्ये पाकिस्‍तान संघाचा सामना गुणतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशविरुद्‍ध होत आहे. यानंतर संघाचा सामना 4 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये न्यूझीलंड आणि 11 नोव्हेंबरला कोलकाता येथे इंग्लंडशी होणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news