Rohit Sharma Record : रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, जाणून घ्या आकडेवारी

Rohit Sharma
Rohit Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने षटकारांचा आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. पुण्यात बांगलादेश विरुद्ध दोन षटकार मारल्यानंतर त्याने आशिया खंडात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी च्या 205 षटकारांची नोंद आहे.

रोहित शर्मा बनला सिक्सर किंग कर्णधार!

रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या खेळीत पहिला षटकार ठोकताच, कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यासह त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकले. मॉर्गनने 2019 मध्ये कर्णधार म्हणून 60 षटकार मारले होते, परंतु रोहित शर्माने त्याला मागे टाकले. हिटमॅनच्या एकावर्षातील षटकारांची संख्या 63 पर्यंत पोहचली आहे. अजून अनेक सामने बाकी आहेत. तसेच वर्ष संपायलाही काही दोन-अडीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे रोहितच्या षटकारांची संख्या नक्कीच वाढताना आपल्याला दिसणार आहे. या यादीत एबी डिव्हिलियर्स 59 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2015 मध्ये हा पराक्रम केला होता. या यादीत न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्क्युलम (2014 मध्ये 54 षटकार) चौथ्या तर ख्रिस गेल (2009 मध्ये 53 षटकार) पाचव्या स्थानावर आहे.

धोनीचे 157 षटकार

आशिया खंडात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 157 षटकार मारले आहेत. या यादीत सनथ जयसूर्या (148) चौथ्या, सचिन तेंडुलकर (145) 5व्या, सौरव गांगुली (106) 6व्या, युवराज सिंग 104 (7व्या), इंझमाम उल हक (98) 8 व्या, विराट कोहली (86) आणि वीरेंद्र सेहवाग (86) संयुक्तपणे 9व्या स्थानावर आहेत.

रोहित शर्माच्या आशियामध्ये 6,000 वनडे धावा पूर्ण

आशियाई भूमीवर, रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या डावात 6000 वनडे धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. सचिनने 288 सामन्यात 12,067 धावा केल्या. विराट कोहली दुसऱ्या (7,784), महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या (6,929), सौरव गांगुली चौथ्या (6,302), मोहम्मद अझरुद्दीन पाचव्या (6,267), राहुल द्रविड सहाव्या (6,127), रोहित शर्मा 7व्या (6,000*), युवराज सिंग (5,683) 8व्या, वीरेंद्र सेहवाग (5,644) 9व्या आणि गौतम गंभीर (3,974) 10व्या स्थानावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news