पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने आयसीसी वनडे क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे. विंडीजचा तीन सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्विप दिल्यानंतर भारत 110 गुणांसह वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या अनुक्रमे 128 आणि 119 गुणांसह पहिल्या आणि दुस-या क्रमांकावर आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत सारख्या नियमित खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनने संघाचे नेतृत्व केले आणि विंडीजला त्यांच्याच मैदानावर क्लीन स्वीप देणारा पहिला संघ बनला.
या शानदार विजयानंतर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 4 गुणांची आघाडी घेतली आहे. पाकिस्तान 106 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. विंडीजबद्दल बोलायचे झाले तर, सलग 9 सामने गमावल्यानंतर या संघाची वनडे क्रमवारीत 9व्या स्थानावर घसरण झाली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची या वर्षाची सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा 5-0 ने पराभव केला. द. आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर भारताने 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत.
दुसरीकडे न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त 101 गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका अनुक्रमे पाचव्या-सहाव्या स्थानावर आहेत. तर बांगलादेश (98) 7व्या, श्रीलंका (92) 8व्या, अफगाणिस्तान (69) 10व्या स्थानावर आहेत.
1. न्यूझीलंड – 128 गुण
2. इंग्लंड – 119 गुण
3. भारत – 110 गुण
4. पाकिस्तान – 106 गुण
5. ऑस्ट्रेलिया – 101 गुण
6. दक्षिण आफ्रिका – 101 गुण
7. बांगलादेश – 98 गुण
9. श्रीलंका – 92 गुण
9. वेस्ट इंडिज – 69 गुण
10. अफगाणिस्तान – 69 गुण