मी लावणी डान्सर नाही, आता लावणीवर डान्स करायचा ही भीती वाटते : गौतमी पाटील

मी लावणी डान्सर नाही, आता लावणीवर डान्स करायचा ही भीती वाटते : गौतमी पाटील
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  माझ्या करिअरची सुरूवात अकलुजच्या लावणी महोत्सवात झाली. असे असले तरी सध्या मी लावणी डान्सर (नृत्यांगना) नाही, मी डीजे डान्सर आहे. मी कधीही स्वतःचा उल्लेख लावणी डान्सर म्हणून करत नाही, असे नृत्यांगना व अभिनेत्री गौतमी पाटील हिने स्पष्ट केले. गौतमी पाटील तिच्या 'घुंगरू' आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बुधवारी पुण्यात आली होती. यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला. एका लावणीवरून ट्रोल केले गेले होते, त्यामुळे लावणीवर डान्स करायचीही भीती वाटते, असेही ती म्हणाली.

गौतमी पाटील लावणी डान्सर नाही तर ती डीजे डान्सर आहे, असा लावणी कलावंतांकडून आरोप होत असल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली, "मी लावणी डान्सर नाही. माझ्या कार्यक्रमात केवळ चंद्रा आणि तुम्हा बघून तोल माझा गेला या दोन लावण्या असतात. बाकी वेगवेगळ्या गाण्यांवर, लोकगीतांवर मी आणि माझ्या सहकारी मुली डान्स करतो. तो रसिकांना आवडतो. लावण्या करण्याचा विचार होता. मात्र, एका लावणीवरून मला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले, माझ्यावर टिका झाली. त्यामुळे आता लावणीवर डान्स करायचा म्हटलं तर भीती वाटते."

मी डान्स करत असलेल्या गाणी व डान्सची फर्माइश लावण्यांच्या कार्यक्रमात होत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. उलट रसिकांची ही फर्माइश माझ्यावर असलेले प्रेम आहे, त्यामुळे मी त्या रसिकांचे मनापासून आभार मानते. पूर्वी जास्त पुरुष मंडळी कार्यक्रमाला येत होते. आता मात्र, महिला रसिक वर्ग मोठ्या प्रमाणत येतात, हे पाहून आनंद वाटतो. रसिकांनी कार्यक्रमाला यावं, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, आणि सुखरुप घरी जावे, गडबड गोंधळ करू नये, अशी माझी इच्छा असते, असेही गौतमी म्हणाली. माझ्या सहकारी मुली वेगळ्या होऊन स्वतंत्र उभ्या राहतात, तेव्हा वाईट वाटत नाही, उलट आनंदच वाटतो, असेही ती म्हणाली.

संबंधित बातम्या :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news