पुढारी ऑनलाइन डेस्क : Hydrabad Police Action हैदराबाद पोलिसांनी 903 कोटींच्या चिनी गुंतवणुकीच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक चिनी नागरिक एक तैवानच्या नागरिकासह 10 जणांना अटक केली आहे. हैदराबाद शहराच्या साइबर क्राइम ब्रांच ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला, अशी माहिती हैदराबाद पोलिस आयुक्त सीवी आनंद यांनी दिली.
Hydrabad Police Action चीनच्या के लेक उर्फ ली झोंगजून आणि ताइवानच्या के चू चुन-यू हे मुख्य विदेशी आरोपी असून लेक हा दिल्लीतील एका डिटेंशन सेंटरमध्ये होता. तर चू याला मंगळवारी रात्री त्याला कंबोडियातून मुंबईला आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. या दोघांसह साहिल बजाज, सनी, वीरेंद्र सिंह, संजय यादव, नवनीत कौशिक, मो. परवेज, सैयद सुल्तान और मिर्जा नदीम बेग अशी अटक आरोपींची नावे आहे.
Hydrabad Police Action पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण खूपच किचकट आणि गुंतागुंतीचे होते. यामध्ये आरबीआयच्या अधिकृत कार्य प्रणाली मनी चेंजरचा उपयोग करून अवैध पद्धतीने धनराशी एकत्रित करून तिला एका अॅपमध्ये गुंतवणूक करण्यात येत असे. नंतर अॅपच्या माध्यमातून ती डॉलरमध्ये बदलून हे पैसे विदेशात पाठवण्याचे कार्य केले जात होते.
हैदराबादमधील एका व्यक्तिने एक गुंतवणूक अॅपमध्ये 1.6 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर आपली फसवणूक करण्यात आली अशी तक्रार हैदराबाद पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना या अॅपद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले.
Hydrabad Police Action दरम्यान, तक्रारदार व्यक्तिचे 1.6 लाख रुपये Xindai Technologies बँक खात्यात जमा करण्यात आले जे आरोपी वीरेंद्र सिंह ने उघडले होते. पोलिसांच्या संदिग्ध चौकशीत हे चीनी फसवणूक असू शकते असे लक्षात आले. कारण वीरेंद्र ने जैक नावाच्या व्यक्तिच्या निर्देशावरून हे खाते उघडले होते. माहितीनुसार जैक हा चीनमध्ये असतो, असे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होत गेला.
तपासादरम्यान एक अतिशय गुंतागुंतीच्या किचकड प्रक्रियेद्वारे ही फसवणूक करण्यात येत होती हे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालाच्या माध्यमातून जवळपास 903 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण यापेक्षा खूप मोठे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात याचे जाळे विणले गेले असल्याची आणि यापेक्षा मोठी रक्कमेची फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ईडी आणि राजस्व गुप्त निदेशालय यांसारख्या केंद्रीय एजंसींना पुढील तपासासाठी सहभागी करून घेणार आहोत, असे हैदराबाद पोलिसांनी सांगितले.