Money Londring Case : चौकशीसाठी नोरा फतेही पोहोचली दिल्ली येथील EOW कार्यालयात | पुढारी

Money Londring Case : चौकशीसाठी नोरा फतेही पोहोचली दिल्ली येथील EOW कार्यालयात

पुढारी ऑनलाइन डेस्क : अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही ही चौकशीसाठी दिल्ली येथील EOW (Economic offence wing) कार्यालयात दाखल झाली आहे. मनी लाँड्रिंग केसमध्ये तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून गिफ्ट स्वीकारल्याप्रकरणात ईडी कडून नोरा फतेहीची आज चौकशी होणार आहे. Money Londring Case

जॅकलिन फर्नांडिसची याच केसमध्ये काल तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. तर याच प्रकरणी आज नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. यापूर्वी देखिल नोराची याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. आता आज या प्रकरणी तिची पुन्हा चौकशी होणार आहे. नोहाला तसा समन्स देण्यात आला होता. त्यानुसार नोहा फतेही आज दिल्ली येथील EOW (Economic offence wing) कार्यालयात दाखल झाली आहे. Money Londring Case

एएनआयने याचा ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. नोहा आपल्या आलिशान ब्ल्यू रंगाच्या गाडीत ब्लॅक हुडी घालून मास्क लावून EOW च्या कार्यालयात दाखल झाली आहे. पाहा व्हिडिओ

सुकेश चंद्रशेखर हा ठकसेन सध्या तुरुगांत आहे. त्याच्यावर २०० कोटींच्या फसवणुकीचे आरोप आहेत. सुकेशने जॅकलिन आणि नोरा यांच्यावर भेटवस्तूंची उधळण केली होती. त्यातून या दोघींची चौकशी सुरू आहे. पिंकी इराणी हिने सुकेश आणि जॅकलिनची ओळख करून दिली होती. पोलिसांनी काल पिंकी इराणी हिचीही चौकशी केली.

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन अडचणीत; ८ तास चौकशी, जबाबात तफावत

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची मनीलाँड्रिंग केस प्रकरणी तब्बल ८ तास चौकशी

Back to top button