Human composting : मानवी कंपोस्टिंगला परवानगी देणार्‍या शहरांमध्‍ये न्यूयॉर्कचाही समावेश  

human composting
human composting
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मानवी कंपोस्टिंगला परवानगी देणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील नवीन राज्य बनले आहे. यापूर्वी अमेरिकेतील काही राज्यांनी मानवी कंपोस्टिंगला परवानगी दिलेली आहे. शनिवारी (३१ डिसेंबर)  न्यूयॉर्कचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी याबाबत मान्यता दिला. या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाल्यानंतर मानवी कंपोस्टिंगला (Human composting ) परवानगी देणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील सहावे राज्य ठरले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दफन किंवा अंत्यसंस्कारासाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय म्हणून पाहिले जाते. याला "नैसर्गिक सेंद्रिय घट" म्हणूनही ओळखले जाते. या प्रक्रियेत कंटेनरमध्ये बंद केल्यानंतर काही आठवड्यांपर्यंत शरीराचे विघटन होते. 2019 मध्ये वॉशिंग्टन हे कायदेशीररित्या मानवी शरीराचे विघटन करणारे अमेरिकेतील पहिले राज्‍य ठरले होते. त्यानंतर कोलोरॅडो, ओरेगॉन, व्हरमाँट आणि कॅलिफोर्निया या राज्यांमध्‍येही या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली होती.

Human composting : कशी असेल प्रक्रिया?

मानवी शरीराचे मातीत रुपांतर करण्यासाठी वुडचिप्स, अल्फल्फा आणि स्ट्रॉ गवत यांसारख्या निवडक सामग्रीसह एक बंद भांड्यात शरीर ठेवले जाते. त्यानंतर सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे ते हळूहळू तुटते. सुमारे एक महिन्याच्या कालावधीनंतर आणि कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घेत प्रक्रिया करुन संबंधित मृत व्यक्तीच्या  प्रियजनांना ही माती दिली जाते. याचा उपयोग फुले, भाज्या किंवा झाडे लावण्यासाठी केला जाऊ शकतो.

किफायतशीर तसेच पर्यावरणीय

कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन हे हवामान बदलासाठी कारणीभूत आहे. शवपेटी समाविष्ट असलेल्या पारंपारिक दफनांमध्ये लाकूड, जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधने देखील वापरली जातात. मानवी शरीराचे मातीत रुपांतर प्रक्रिया एक टन कार्बन वाचवू शकते. मानवी कंपोस्टिंगच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, ज्या शहरांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा मर्यादित आहे तेथे याचा वापर अधिक व्यावहारिक आहे. मानवी शरीराच्‍या कंपोस्टिंगचे समर्थन करणाऱ्यांनी ही प्रक्रिया किफायतशीर तसेच पर्यावरण पूरक असल्याचा दावा केला आहे. न्यूयॉर्क राज्यातील कॅथोलिक बिशपांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news