Mango IceCream : फक्त पाच साहित्यांनी बनवा टेस्टी मॅंगो आईस्क्रीम

Mango IceCream
Mango IceCream
Published on: 
Updated on: 

 पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून प्रत्येकांची लाहीलाही होत आहे. नागरिकांची एकीकडे कामाची धावपळ वाढली आहे. तर दुसरीकडे कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान काही नागरिकंचा कल शीतपेयांकडे वळला आहे. यात मसाले ताक, सरबत, दही, मट्ठा, कोल्ड्रिंक्स, थंड उसाचा रस, आईस्क्रीम, थंडाई, आईस गोळा, लस्सी, कुल्फी, काकडी यांसारख्या पदार्थांचे सेवन केले जाते. सध्या आंब्याचा सीझन सुरू झालाय. त्यामुळे या शीतपेयांसोबत आमरस, ज्यूस, आम्रखंडवर ताव मारला जातो. दरम्यान, कडक उन्हाळ्यात टेस्टी आणि थंडगार आंब्यापासून आईस्क्रीम बनवता येईल. ते पाहुयात… ( Mango IceCream )

सहित्य –

पिकलेले आंबे- २ नग
दुध- अर्धा लिटर
कॉर्न फ्लोर- २ चमचे
थंड दुध- एक कप
साखर – एक कप
वेलदोडे पावडर – अर्धा चमचा

कृती-

१. पहिल्यांदा पिकलेले दोन आंबे घेवून ते स्वच्छ पाण्याने धुवावे. यानंतर त्याचे साल आणि कोय काढून बारीक छोटे- छोटे तुकडे करून घ्यावेत.

२. गॅसवर एका कढाईत अर्धा लिटर दुध उकळत ठेवून ते मधून-मधून दुध हलवत रहावे.

३. यानंतर दोन चमचे कॉर्न फ्लोर घेवून त्यात एक कप थंड दूध घालून छान मिक्स करून घ्यावे.

४. ३ ते ४ मिनिटे दुध उकळून घेतल्यानंतर त्यात एक कप साखर घालावी.

५. या मिश्रणात अर्धा चमचा वेलदोडे पावडर आणि आवश्यक असल्यास थोडंस केसर घालावे.

६. परत १-२ मिनिटे दुध चांगले उकळून घेतल्यानंतर कॉर्न फ्लोरचे थोडे- थोडे मिश्रण घालून चांगले हलवावे. (मिश्रणाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी.)

७. १-२ मिनिटे हे मिश्रण चांगले शिजवून घ्यावून त्यानंतर हे मिश्रण १५ ते २० मिनिटे थंड होण्यास ठेवावे.

८. थंड झालेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात आब्यांचे तुकडे घालून फिरवून घ्यावेत.

९. तयार झालेले मिश्रण एका डब्यात काढून त्यावर झाकण लावून ३ ते ४ तासासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.

१०. चार तासानंतर परत हे मिश्रण फ्रिजमधून बाहेर काढून ते पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

११. यानंतर सपाट असलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतून त्यात आंब्यांचे तुकडे, ड्रायफ्रूट घालावे.

१३. हे मिश्रण पुन्हा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून सकाळी काचेच्या ग्लासमधून खायला घ्यावे. ( Mango IceCream )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news