Animal Anil Kapoor : ‘ॲनिमल’मधील अनिल कपूरचा असा तयार झाला बलबीर सिंग (Video)

anil kapoor
anil kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्लॉकबस्टर संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलमध्ये अभिनेता अनिल कपूरच्या बलबीर सिंगची भूमिका भाव खाऊन गेली आणि या बद्दल अनिल कपूर यांचं कौतुकदेखील झालं. ही भूमिका सुपरहिट तर ठरली. (Animal Anil Kapoor ) पण अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी खूप ट्रेनिंग घेतलं आणि याच भूमिके मागची खास गोष्ट त्यांनी त्यांचा सोशल मीडिया व्हिडिओ मधून दाखवली आहे. (Animal Anil Kapoor )

संबंधित बातम्या –

चित्रपटातील पडद्यामागील ही गंमत आणि अनिल यांची अपार मेहनत या व्हिडिओ मधून बघायला मिळतेय. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी विशेष कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला याची गोष्ट उघड केली आहे. ४० वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या हा मेगास्टार आता त्याच्या शिस्तबद्ध आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पात्रासाठी पद्धतशीर दृष्टिकोणासाठी ओळखला जातो आणि यावेळीही दुहेरी भूमिकेच्या तयारीचा भाग म्हणून त्याने प्रोस्थेटिक्सचा वापर केला. भूमिका आणि त्यासाठीची मेहनत अनिल कपूर यांनी घेऊन या भूमिकेला न्याय देऊन पुन्हा एकदा आपली कलाकारी सिद्ध केली आहे.

video – Bollywood Hungama Instagram वरून साभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news