Aishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी?

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी?
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय ४७ व्या वर्षी प्रेग्नंट होतेच कशी?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांची जोडी बाॅलिवुड प्रसिद्ध जोडी आहे. ऐश्वर्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, त्यावरून तिच्या चाहत्यांनी तिला विचारलं की, "तू गरोदर आहेस का?" अशा काॅमेंट्सवरून ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा माध्यमांच्या चर्चेत आली.

तसं पाहिलं तर, ऐश्वर्यानं (Aishwarya Rai) त्या प्रश्नांची उत्तर दिलीच नाहीत. पण, चाहत्यांना ऐश्वर्याचे फोटो पाहून आणखी प्रश्न पडू लागले की, या वयात म्हणजे ४७ वर्षी ऐश्वर्या राय बच्चन कशी गरोदर राहू शकते? अर्थात हा प्रश्न चाहत्यांना काळजीपोटी पडला असावा.

चाहत्यांना असा का प्रश्न पडला? 

वयाची ४५ वर्षे पार केल्यानंतर स्त्रीनं गरोदर राहणं धोक्याचं मानलं जातं. कारण, या वयात स्त्रीचं वय हळूहळू थकत जातं आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. साधारणपणे नैसर्गिकरित्या ४५ वर्षी स्त्रीया गरोदर राहू शकतात. पण, अशी उदाहरणं फार दुर्मिळ असतात.

या वयाच फर्टिलिटी ट्रिटमेंटच्या माध्यमातून मातृत्वाचं सूख मिळतं. परंतु, या पंचेचाळीशीनंतर मेनोपाॅज सुरू होण्याची शक्यता असते. याबाबतील स्त्रीयांची मासिक पाळी महत्वाची ठरते. म्हणजे काय, तर १२ महिने सतत मासिक पाळी महिलेला येत असेल, तर तिच्या गरोदरपणात अडचणी जास्त येत नाहीत. असं असलं तरी, प्रत्येक महिलेचे याबाबतीतील निकष आणि शारीरिक प्राॅब्लेम्स वेगवेगळे असतात.

मूळात पंचेचाळीशीनंतर केवळ १-५ टक्के महिलांमध्ये गरोदर राहू शकतात. ३० व्या वर्षांपर्यंत गरोदर राहण्याचं प्रमाण हे ४५ टक्के इतकं असतं. त्यामुळे ४५ वर्षे आणि ३० वर्षे अशी वयं असणाऱ्या महिलांच्या गरोदरपणाची विचार केला तर त्यात फरक असतो.

पंचेचाळीशीनंतर गरोदरपणा महिलांना हे त्रास होऊ शकतात?

वयाच्या ४५ वयानंतर महिला गरोदर राहिल्या तर, त्यांना मिसकॅरेज, सिजेरियन डिलिव्हरी, ब्लड प्रेशर, जेस्टेशनल डायबिटिज, एक्टोपिक प्रेग्रेंसी, प्लेसेंटामधील अडचणी, असा वेगवेगळ्या अडचणींचा महिलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या वयात गरदोर राहणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेणं महत्वाचं असतं.

पहा व्हिडीओ : बाळंतपणानंतर घ्यायची काळजी व वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news