Uttarkashi Tunnel rescue operation : उत्तराखंड बोगदा दुर्घटनेनंतर कसे राबवले बचावकार्य? जाणून घ्‍या सविस्‍तर

Uttarkashi Tunnel rescue operation
Uttarkashi Tunnel rescue operation

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात १२ नोव्‍हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्‍यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्‍लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात  ४१ कामगार  अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्‍या गेलेल्‍या अथक मदतकार्याच्‍या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्‍यात आज (दि. २८ ) यश आले. (Uttarkashi Tunnel rescue operation) जाणून घेवूया बोगदा दुर्घटनेनंतरच्‍या  बचावकार्याविषयी…

सुरुवातीला बोगद्यात अडकलेल्या कामगारांची संख्या ३६ असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांची संख्या ४० असल्याचे सांगण्यात आले. एका आठवड्यानंतर, कंपनीने सांगितले की, ४१ मजूर बोगद्यात अडकलेल्या आहेत. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ,एनएच आयडीसीएल,उत्तराखंड पोलिस, एसजीव्‍हीएनएल, आरव्‍हीएनएल, लार्सन अँड टुब्रो, टीएचडीसी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा प्रशासन, ओएनजीसी, आयटीबीपी, उत्तराखंड पाटबंधारे विभाग, डीआरडीओ,, परिवहन मंत्रालय, होमगार्ड बचाव कार्यात सहभागी झाले होते. (Uttarkashi Tunnel rescue operation)

कामगारांच्‍या सुटकेसाठी ६ ठिकाणी खोदकाम

कामगारांना वाचवण्यासाठी 6 योजनांवर काम सुरू असल्‍याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्‍पष्‍ट केले होते. बोगदा प्रवेशव्‍दारातून ऑगर मशीनने ड्रिलिंग करण्‍यात आले. बोगद्याच्या वरपासून उजवीकडे आणि डाव्या बाजूने ड्रिलिंग केले गेले. बोगद्याच्या मध्यभागी 6 इंची लाइफ सपोर्ट सिस्टीम बसवण्यात आली. RBNL, SGNB, THDC आणि ONGC च्या टीम्सना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्‍या. (Uttarkashi Tunnel rescue operation)

१४ नोव्‍हेंबर रोजी कामगारांना वाचवण्यासाठी बोगद्याच्या आत खोदकाम सुरू करण्‍यात आले. आता लवकर कामगारांची सुटका होईल, अशी अशा निर्माण झाली. मात्र गुरुवार १६ नोव्‍हेंबर रोजी पहिल्या मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर दुसऱ्या अमेरिकन ऑगर मशीनने ड्रिलिंग सुरू केले.

१७ व्या दिवशी बचावकार्य

व्हर्टिकल ड्रिलिंग आज ५४ मीटरवर थांबवण्यात आले आणि बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात आले. ड्रिलिंग कामात कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग थांबविण्यात आले. १७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आणखी १.५ मीटर पाईप पुढे ढकलण्यात आली. दुपारपर्यंत बोगद्यात एकूण ५५.३ मीटर पाईप ढकलण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित अंतर कापून पाईप पुढे नेण्यास बचावकार्याला यश आले.

Uttarkashi Tunnel rescue operation: रोबाे आणि ड्राेनची मदत

तज्ज्ञांच्या पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. डीआरडीओचे दोन ७० किलो वजनाचे रोबोट येथे पोहोचले होते; परंतु वालुकामय मातीमुळे त्‍याचा वापर करता आला नाही. ड्रोनच्या साह्याने छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोही अपयशी ठरला. इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अरनॉल्ड डिक्सला यांनीही घटनास्‍थळी भेट दिली. याशिवाय हिमाचलमधील बोगद्या दुर्घटनेत कामगारांना वाचवणाऱ्या टीमलाही येथे पाचारण करण्यात आले होते.

अखेर चार इंच पाईपलाईन कामगारांपर्यंत पोहचविण्‍यात यश

बचाव पथकाला चार इंची फूड पाईप कामगारांपर्यंत पोहचविण्‍यात यश आले. कामगारांशी संपर्क होत होताच. ऑक्सिजन, पाणी, पॅकबंद अन्नाचे पाकिट पुरवणे सुरू आले. यानंतर ओआरएस, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या, सुका मेवा पाठवला गेला. अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संवादही प्रस्थापित झाला. यावेळी त्‍यांनी आम्‍हाला अन्‍नपुरवठ्यापेक्षा ऑक्‍सिजनची कमतरता भसणार नाही, याकडे लक्ष द्या, अशी विनंती केली होती. बोगद्याच्या बांधकामादरम्यान पाण्याची पाईपलाइन टाकण्यात आली. यामुळे त्‍यांच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था झाली. (Uttarkashi Tunnel rescue operation)

नैराश्‍याविरोधी औषधांचाही पुरवठा

बचावकार्य लांबत चालल्‍यामुळे बोगद्यात अडकलेल्या कामगारांमध्‍ये नैराश्‍याची भावना दिसू लागली. अडकलेल्‍या कामगारांचे मानसिक संतुलन कायम राखण्‍यासाठी बचाव पथक त्यांना नैराश्यविरोधी औषधे देखील दिली. सुदैवाने बोगद्याच्या आतल्या दोन किलोमीटरच्या भागात अजूनही वीजपुरवठा सुरु होता. कामगारांना तेथून प्रकाश मिळाला.

नवव्‍या दिवशी सहा इंच पाईपलाईनमधून पाठवली खिचडी

नवव्या दिवशी संध्याकाळी उशिरा बचाव पथकाला यश मिळाले. दुसरी सहा इंची फूड पाईप कामगारांना देण्यात आली. या पाईपच्‍या माध्‍यमातून ९ व्‍या दिवशी सायंकाळी उशिरा खाण्यासाठी खिचडी आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर या पाईपद्वारे पाठवले गेले.

एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेर्‍याचीही घेतली मदत

दहाव्या दिवशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा पोहोचवण्यात आला. बचाव कर्मचारी वॉकीटॉकीद्वारे अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. काही मजुरांनी पोटदुखीची तक्रार केली, त्यासाठी औषध पाठवण्‍यात आले. काही आवश्यक कपडे, ब्रश आणि पेस्टही कामगारांना पाठवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने कामगारांशी बोलण्यासाठी ऑडिओ कम्युनिकेशन सुरू केले आहे. मायक्रोफोन आणि स्पीकर आत पाठवले गेले.

बुधवार, २३ नोव्‍हेंबर रोजी ४१ कामगारांपर्यंत खाद्यपदार्थांबरोबरच कपडे आणि औषधेही कामगारांना पाठवण्यात आली. एनएचआयडीसीएलचे एमडी महमूद अहमद यांनी सांगिलते की, कामगारांना चार आणि सहा इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ सतत पाठवले जात आहेत. बुधवारी त्यांना रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आले तसेच टी-शर्ट, अंडरगारमेंट, टूथपेस्ट आणि ब्रशसोबतच त्यांना साबणही पाठवण्यात आला. कामगारांनी कपडे बदलले, हात धुतले आणि जेवण केले. त्यांनी सांगितले की, सर्व मजुरांना टेलिस्कोपिक कॅमेऱ्याच्या मदतीने पाहिले गेले आहे.

बोगद्याच्या आतील कामगारांचे स्वरूप केवळ दुर्बिणीच्या कॅमेऱ्यांद्वारेच दिसत होते, बुधवार, २३ नोव्‍हेंबर रोजी दिवसभरात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने येथे ऑडिओ सिस्टीमही तयार केली. त्यासाठी बोगद्याच्या आत सहा इंची पाईपद्वारे मायक्रोफोन आणि स्पीकर पाठवण्यात आले. सर्वांशी बोलून डॉक्टरांनी त्यांची प्रकृतीची विचारपूस केली.

सचिव डॉ. नीरज खैरवाल यांनी सांगितले की, दोन मजुरांनी बराच वेळ अन्न न घेतल्याने सकाळी पोटदुखीची तक्रार केली होती. फक्त ड्रायफ्रुट्स खाल्‍याने त्‍यांना त्रास होत होता. पाईपद्वारे तात्काळ त्याच्याकडे औषधी पाठवण्यात आली, त्यानंतर कोणतीही तक्रार आली नाही.

बचावकार्यात अडथळय़ांची मालिका

एकीकडे बचावकार्य अंतिम टप्‍प्‍यात आल्‍याचे मानले जात होते. खोदकाम सुरु असताना ऑगर यंत्र बोगद्याच्या छतासाठी उभ्या केलेल्या धातूच्या खांबांना धडकल्याने त्यात बिघाड निर्माण झाला. १३ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका करण्यासाठी 'ऑगर' यंत्राने खोदकाम करण्याचे प्रयत्न थांबले गेले. यानंतर बोगद्याच्या वरच्या बाजूने टेकडीवरखोदकाम करून ढिगारा ऑगर यंत्राऐवजी मानवी मदतीने म्‍हणजे कामगारांमार्फत उपसण्‍याच निर्णय झाला. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्याच्या वरच्या बाजूने सुमारे ८६ मीटर खोदकाम करण्याची गरज आहे, असे राष्‍ट्रीय आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे एनडीएएचे सदस्‍य लेफ्‍टनंट जनरल (निवृत्त) सईद अता हसैनन यांनी स्‍पष्‍ट केले होते.

अरनॉल्‍ड डिक्‍स यांनी केले बचाव कार्याचे कौतुक

इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे (आयटीए) अध्यक्ष प्रा. अरनॉल्ड डिक्स यांनी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या बचाव मोहिमेचे कौतुक केले हाेते. बचावकार्य सुरु असताना ते म्‍हणाले की, बोगद्याशी संबंधित अपघातात, जेव्हा अडकलेल्या बहुतेक लोकांचा मृत्यू होतो. त्‍यानंतर घटनास्‍थळी बचावपथक पोहचते. मात्र उत्तराखंडमध्‍ये बोगद्यात अडकलेल्‍या कामगारांच्‍या बचावासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यात आत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एकाच वेळी विविध पर्यायांवर काम केले जात आहे. प्रत्येक पर्यायातील धोका ओळखून काम केले

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news