Russia Ukraine War : हॉलिवूड अभिनेता लिओनार्डोचे युक्रेनशी आहे खास नाते!, जाणून घ्या..

Russia Ukraine War : हॉलिवूड अभिनेता लिओनार्डोचे युक्रेनशी आहे खास नाते!, जाणून घ्या..
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेन ( Russia Ukraine War ) विरुद्ध छेडलेल्या युद्धाची सर्वस्तरातून निंदा होऊ लागली आहे. रशिया आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांचा अनेकजण जाहीर रित्या विरोध करत आहेत. युद्धावर बॉलिवूडच्या कलाकरांनी देखिल युक्रेनची बाजू घेतली आहे. तसेच हॉलिवूडचे कलाकार देखिल आता खुले आम रशियाला विरोध करत युक्रेनला पाठिंबा देत आहेत. दरम्यान, टायटॅनिक चित्रपटाचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओने (Leonardo DiCaprio) आता युक्रेनला मदतीचा हात देऊ केला आहे. फक्त इतके नाही तर त्याचे युक्रेनशी एक खास नाते सुद्धा आहे.

रशिया आणि युक्रेनमधील ( Russia Ukraine War ) युद्धाने इतर देशांनाही हादरवले आहे. या युद्धाचा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, परंतु युक्रेनला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कारण रशियासारख्या विशाल देशासमोर युक्रेन लहान आहे. अशा परिस्थितीत केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडचे सेलिब्रिटीही या हल्ल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा निषेध करत आहेत. दरम्यान, 'टायटॅनिक' अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओने युक्रेनला मदतीचा हात पुढे केल्याची बातमी येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिओनार्डो डिकॅप्रिओने युक्रेनला मदत करण्यासाठी 10 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 76 कोटी भारतीय रुपये दान केले आहेत. असे म्हटले जाते की या अभिनेत्याची आजी युक्रेनच्या ओडेसा येथील रहिवासी होती. त्यामुळेच लिओनार्डोचे युक्रेनशी घट्ट नाते आहे. ( Russia Ukraine War )

यापूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी व्लादिमीर पुतिन यांची निंदा केली होती. क्रिस्टन स्टीवर्टने मंचावरून युक्रेनच्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

यापूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या युद्धाचा निषेध केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या महिन्यात युक्रेनवर आक्रमण केले. या हल्ल्यात दररोज लोक आपला जीव गमावत आहेत. युक्रेन विनाशाच्या मार्गावर आहे. तरीही ते रशियाला कडवी टक्कर देत आहे. ( Russia Ukraine War )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news