मुंबई, पुढारी ऑनलाईन: कोरोना महामारीचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 17 आणि 18 मार्च रोजी सर्वत्र होळी, धुलिवंदनचा सण साजरा होत आहे. या सणावर राज्य सरकारकडून कोणतेही निर्बंध घातले गेलेले नाहीत. परंतु गृहखात्याकडून या सणानिमित्त काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निर्बंधाशिवाय होळी साजरी येईल.
होळीची लगबग सर्वत्र सुरु आहे. यामध्ये कोरोनाचे निर्बंध कमी केले आहेत. यातच राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. सध्या देशात कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामूळे मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. या होळी आणि धुळवड सणा निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.
हेही वाचा